एक्स्प्लोर

मुंबईत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राखण्यासाठी सहा समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती

अन्न व औषध प्रशासन खात्यावर असलेला अत्यंत ताण लक्षात घेता मुंबईतील ऑक्सिजन पुरवठा संदर्भात समन्वय राखण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने 6 अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून तातडीने नियुक्ती करण्यात आली आहे.

 मुंबई : कोविड विषाणू बाधित रुग्णांची संख्या वाढल्यानंतर रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी देखील वाढली आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबईतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठ्याबाबत योग्यरित्या आणि वेळीच कार्यवाही व्हावी, म्हणून  मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 6 समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे समन्वय अधिकारी ऑक्सिजन पुरवठादार, सहाय्यक आयुक्त आणि अन्न व औषध प्रशासन यांच्यात समन्वय राखण्याचे काम करणार आहे.

अन्न व औषध प्रशासन खात्यावर असलेला अत्यंत ताण लक्षात घेता मुंबईतील ऑक्सिजन पुरवठा संदर्भात समन्वय राखण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने 6 अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून तातडीने नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील 24 प्रशासकीय विभागांसाठी प्रत्येकी 4 विभागास 1 याप्रमाणे हे समन्वय अधिकारी कामकाज सांभाळतील. तसेच प्रत्येकी 4 विभागास 1 याप्रमाणे एकूण 6 ऑक्सिजन पुरवठादार नेमण्यात येतील. महानगरपालिकेचे समन्वय अधिकारी हे अन्न व औषध प्रशासन, विभागांचे सहाय्यक आयुक्त आणि ऑक्सिजन पुरवठादार यांच्यात समन्वय साधून ऑक्सिजन पुरवठा योग्यरित्या व वेळीच उपलब्ध होत राहील, यासाठी दक्षता घेतील. खासकरुन 64 नर्सिंग होममध्ये कोणतीही अडचण उद्भवणार नाही, यासाठी ते समन्वय साधतील. तसेच उपलब्ध ऑक्सिजनचा योग्यरित्या व काटकसरीने वापर करण्यासाठी केंद्र शासनाकडून  दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचा अवलंब करण्याबाबत या 64 नर्सिंग होमना सूचना करुन प्रशिक्षित करण्याची कार्यवाही महानगरपालिकेचे संचालक करतील. 

मुंबईतील कोविड बेडची स्थिती

 मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका, शासकीय आणि खासगी असे मिळून एकूण 150 कोविड रुग्णालय आहेत. या रुग्णालयांमध्ये आज 20 हजार बेड असून येत्या आठवड्यात 22 हजार इतक्या होणार आहेत. मागील 15 दिवसात मुंबईतील कोविड रुग्णांची दैनंदिन संख्या 8 ते 10 हजार दरम्यान स्थिरावली असली तरी पुढील 15 दिवस आणखी महत्त्वाचे आहेत. रुग्णांची वाढलेली संख्या आणि त्यांना लागणारा ऑक्सिजन पाहता पुरवठ्याची व्यवस्था सुरळीत राखणे अत्यंत आवश्यक आहे. मुंबईतील रुग्णालयांना सध्या 235 मेट्रिक टन इतका ऑक्सिजन पुरवठा होत असून वाढती रुग्ण संख्या पाहता अधिकची मागणी शासनाकडे केली आहे. 

पालकमंत्री  आदित्य ठाकरे म्हणाले की, कोविड बाधित रुग्णांच्या उपचारासाठी मुंबई महानगरामध्ये आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असून 2 लाख रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी देखील नोंदविण्यात आली आहे. बेडची संख्या देखील वाढविली जात असून त्यामध्ये ऑक्सिजन पुरवठ्याची सोय अधिकाधिक केली जात आहे. त्यामुळे सध्या होत असलेला ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राखण्याबाबत सर्व यंत्रणांनी आवश्यक तो समन्वय राखणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारे सहकार्य शासनाकडून करण्यात येईल. 

 

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget