एक्स्प्लोर

Angadia Extortion Case : अंगाडीया खंडणी वसुली प्रकरणी 3 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल

Angadia Extortion Case : अंगाडीया खंडणी वसुली प्रकरणी 3 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

Angadia Extortion Case : अंगाडीया खंडणी वसुली (Angadia Extortion Case) प्रकरणात अटकेत असलेल्या तीन पोलीस अधिकाऱ्यांविरोधातील आरोपपत्र किल्ला कोर्टात दाखल करण्यात आलं आहे. जवळपास अकराशे पानांचं हे आरोपपत्र असून त्यात 70 जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. या आरोपींविरोधात तांत्रिक, कागदोपत्री आणि तोंडी पुरावे असून त्याची नोंद देखील आरोपपत्रात करण्यात आली आहे.

अंगडीया खंडणी वसुली प्रकरणात गुन्हे शाखेच्या सीआययू युनिटनं लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओम वंगाटे, एपीआय नितीन कदम, पीएसआय समाधान जमदाडे अशी तिघांना अटक केली होती. हे तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्याविरोधात जळपास अकराशे पानांचं आरोपपत्र शनिवारी किल्ला कोर्टात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणात सात जणांचे न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब दिले असून 70 साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. दरम्यान या गुन्ह्यात अटक केलेले पप्पु गौड आणि आशुतोष मिश्रा यांच्या विरोधातील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून देण्यात आली आहे.

काय आहे अंगडीया खंडणी वसुली प्रकरण प्रकरणं?

डिसेंबर 2021 रोजी अंगडिया असोसिएशननं मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांच्याशी संपर्क साधून डीसीपी त्रिपाठी यांच्यावर आरोप केला की, डीसीपी झोन 2 कडून व्यवसायिकांचा व्यवसाय सुस्थितीत सुरू ठेवण्यासाठी दरमहा 10 लाखांची खंडणी मागण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर आयुक्तांनी या आरोपांच्या चौकशीसाठी दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त दिलीप सावंत यांची नियुक्ती केली आहे. याप्रकरणी झोन 2 मधील एल.टी. मार्ग पोलीस स्टेशनचे निरीक्षक ओम वंगाटे, एपीआय नितीन कदम आणि पीएसआय समाधान जमदाडे यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा, वंगाटे आणि एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अटक केलेल्या अधिकार्‍यांवर डिसेंबर महिन्यात अनेकवेळा अंगाडिया असोसिएनच्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची किंवा आयकर विभागाला त्यांच्या बेकायदेशीर कृतींबद्दल माहिती देण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून 18 ते 20 लाखांच्या आसपास रक्कम उकळल्याचा आरोप ठेवण्यात आला आहेत. पुढील तपासांत त्रिपाठीविरोधातही खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशासकीय कारवाई म्हणून विभागीय चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी राज्याच्या गृह विभागाला डीसीपींच्या निलंबनासाठी पत्र पाठवण्यात आलं होतं. 18 फेब्रुवारी रोजी त्रिपाठींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून तेव्हापासून ते सेवेवर गैरहजर आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर युनिटने (सीआयय़ू) त्रिपाठी यांना फरार घोषित केलेलं आहे. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी अखेर 20 मार्च रोजी डीसीपी सौरभ त्रिपाठी यांच्या निलंबनावर स्वाक्षरी केली.

या प्रकरणाक चर्चेत असलेले सौरभ त्रिपाठी कोण? 

सौरभ त्रिपाठी, हे 2010 बॅचचे आयपीएस अधिकारी असून एमबीबीएस आणि एमडी (त्वचाविज्ञान) पदवीधर असून त्यांनी मुंबईतील नायर रुग्णालयात शिक्षण घेतले आहे. यापूर्वी त्यांनी डीसीपी झोन 4, वाहतूक पोलिसांत डीसीपी, डीसीपी एसबी (1) म्हणून पदभार सांभाळला आहे, त्यापूर्वी अहमदनगरचे एसपी देखील होते. याप्रकरणानंतर त्यांची डीसीपी झोनमधून डीसीपी ऑपरेशन्स या पदावर बदली करण्यात आली होती परंतु फरार असल्यामुळे त्यांनी हा पदभार स्वीकारला नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : MaharashtraMajha Gaon Majha Jilha : 6 AM : माझं गाव माझा जिल्हा : 18 Jan 2025 : ABP MajhaGavthi Katta Special Report :गावठी कट्टा, मराठवाड्याला बट्टा;खंडणी आणि धमकावण्यासाठी कट्ट्यांचा वापरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget