एक्स्प्लोर

Andheri Bypoll: अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके अन् मुरजी पटेलासंह हे 14 उमेदवार मैदानात 

andheri east bypoll : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी 14 उमेदवारांची नामनिर्देशने वैध ठरवण्यात आली आहेत. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख सोमवार 17 ऑक्टोबर आहे.

Andheri Bypoll Election : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये ही प्रतिष्ठेची लढाई मानली जात आहे.  मात्र महाराष्ट्र विधानसभेच्या अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठीच्या या पोटनिवडणुकीत 14 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत. आज छाननीअंती 14 उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत. तर येत्या सोमवारी म्हणजेच 17 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.

वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे आणि त्यांचा पक्ष पुढीलप्रमाणे 

१. श्रीमती ऋतुजा रमेश लटके (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे)

२. श्री.मुरजी कानजी पटेल (भारतीय जनता पार्टी)

३. श्री.राकेश अरोरा (हिंदुस्थान जनता पार्टी)

४. श्री.बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी - पीपल्स)

५. श्री.मनोज श्रावण नायक (राईट टू रिकॉल पार्टी)

६. श्री.चंदन चतुर्वेदी (अपक्ष)

७. श्री.चंद्रकांत रंभाजी मोटे (अपक्ष)

८. श्री.निकोलस अल्मेडा (अपक्ष)

९. श्रीमती नीना खेडेकर (अपक्ष)

१०. श्री.पहल सिंग धन सिंग आऊजी (अपक्ष)

११. श्रीमती फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)

१२. श्री.मिलिंद कांबळे (अपक्ष)

१३. श्री.राजेश त्रिपाठी (अपक्ष)

१४. श्री.शकिब जाफर ईमाम  मलिक (अपक्ष).

याबाबत अधिक माहिती देताना मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले की, आज छाननीअंती १४ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत. तर येत्या सोमवारी म्हणजेच दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. याचबरोबर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाच्या या पोटनिवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहनही मतदारांना केले आहे.

अंधेरी पूर्व मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती
 
या पोटनिवडणुकीसाठी सर्वसामान्य केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून  देवेश देवल (आय. ए.एस.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9372886717 हा असून कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 02231400536 आहे. ते इंडियन ऑईल रेस्ट हाऊस, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे सकाळी 10 ते 11 या कालावधीत जनतेला भेटतील.

पोलीस केंद्रीय निरीक्षक म्हणून कोया प्रवीण (आय.पी.एस.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8355873926 हा असून कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 02231400573 आहे. ते इंडियन ऑईल रेस्ट हाऊस, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे सकाळी 11 ते दुपारी 12 या कालावधीत जनतेला भेटतील. त्याचप्रमाणे निवडणूक खर्च केंद्रीय निरीक्षक म्हणून सत्यजित मंडल  (आय.आर.एस.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  

ही बातमी देखील वाचा

Who is Murji Patel : दांडगा जनसंपर्क, माजी मंत्र्यांचे पीए, नववीपर्यंत शिक्षण, मूळचे गुजरातचे, कोण आहेत मुरजी पटेल?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Embed widget