एक्स्प्लोर

Who is Murji Patel : दांडगा जनसंपर्क, माजी मंत्र्यांचे पीए, नववीपर्यंत शिक्षण, मूळचे गुजरातचे, कोण आहेत मुरजी पटेल?

Rutuja Latke vs Murji Patel : दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल रिंगणात आहेत.

Andheri East Bypoll Election : अंधेरी पोट निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके (Rutuja Latke) विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल (Murji Patel) यांच्यात प्रमुख लढत आहे. असं असलं तरी एकूण 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विद्यमान शिवसेना आमदार यांचा काही महिन्यांपूर्वी ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्या रिक्त जागेवर निवडणूक होत आहे. यासाठी 14 ऑक्टेबर रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. एकूण 25 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल रिंगणात आहेत.

कोण आहेत मुरजी पटेल?

  • मुरजी कांजी पटेल मूळचे गुजरातचे आहेत.
  • ते लहानपणापासून मुंबईत अंधेरी मरोळ येथे राहतात.
  • पटेल यांचे शिक्षण नववीपर्यंत झालं आहे.
  • पटेल हे व्यवसायाने सर्विस प्रोव्हायडर आहेत.
  • मुरजी पटेल हे माजी मंत्री सुरेश शेट्टी यांचे पीए होते.
  • मुरजी यांना पूर्वीपासून सामाजिक कार्याची आवड आहे.
  • मुरजी पटेल यांनी अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक लढवण्याची ही दुसरी वेळ आहे.
  • 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुरजी पटेल यांनी रमेश लटके यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.
  • 2019 मध्ये भाजपा-शिवसेना यांच्या युतीने विधानसभा निवडणूक लढवण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे त्यावेळी मुरजी पटेल यांना भाजपाकडून निवडणूक लढवता आली नव्हती. 
  • अंधेरी पूर्वची जागा भाजपाने शिवसेनेसाठी सोडली आणि शिवसेनेकडून रमेश लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
  • यावेळी मुरजी पटेल यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. 
  • या निवडणुकीत रमेश लटके यांनी जवळपास 16 हजार मतांनी मुरजी पटेल यांचा पराभव केला.
  • 2015-16 या काळात मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नी केसरबेन पटेल यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी केसरबेन पटेल या काँग्रेसच्या तिकीटावर 2012 मध्ये नगरसेविका होत्या.
  • भाजपात प्रवेश केल्यानंतर 2017 मध्ये मुरजी पटेल आणि केसरबेन पटेल या दोघांनीही महानगरपालिका निवडणूक लढवली. दोघंही भाजपाच्या तिकीटावर नगरसेवक बनले. 
  • परंतु जात प्रमाणपत्राच्या मुद्यावरून त्यांचं कोर्टाने त्यांना अपात्र ठरवलं होतं.
  • जनप्रतिष्ठान नावाच्या संस्थेच्या माध्यमातूनही मुरजी पटेल कार्यरत आहेत.
  • अंधेरी पूर्व एमआयडीसी या परिसरात जनप्रतिष्ठान संस्थेचं कार्यालय आहे.
  • 2020 मध्ये मुरजी पटेल यांना भाजपा उत्तर पश्चिम जिल्हाचे महामंत्री पद देण्यात आले.  
  • आता अंधेरी पोट निवडणुकीत ते भाजपचे अधिकृत आहेत.

मुरज पटेल यांचाही जनसंपर्क दांडगा

जीवनज्योत प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुरजी पटेल यांनी अंधेरीमध्ये कामाला सुरुवात केली. मुरजी पटेलांचा जनसंपर्क दांडगा आहे. मराठीसह गुजराती आणि उत्तर भारतीयांशी ते जोडलेले आहेत. मुरजी पटेल सुरुवातीला काँग्रेसमध्ये होते. 2012 साली त्यांच्या पत्नी केशरबेन काँग्रेसच्या तिकीटावर महापालिकेवर निवडून गेल्या. मग 2015 च्या आसपास म्हणजे मोदी लाटेत काँग्रेसचा सुफडा साफ झाल्यावर त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांचा जनसंपर्क, काम करण्याची तडफ बघून भाजपनं त्यांची पत्नी केशरबेन आणि मुरजी पटेल यांना 2017 मध्ये पालिकेची उमेदवारी दिली. दोघंही निवडणूक जिंकले, पण बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याच्या आरोपात त्यांचं नगरसेवक पद रद्द झालं. 

ऋतुजा लटकेंकडे झुकत माप

रमेश लटके यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यातच रमेश लटके यांचा अकाली मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाबद्दल मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांमध्ये एक सहानुभूती आहे. दुसरीकडे रमेश लटके यांच्या पत्नीला निवडणूक लढण्याची इच्छा होती, मात्र मुंबई महापालिकेकडून त्यांचा राजीनामा आधी तांत्रिक मुद्दे काढून स्वीकारला गेला नाही. त्यांना आपल्या उमेदवारीसाठी थेट हायकोर्टाच्या दरवाज्यात जावं लागलं या मुद्द्यामुळे जनमाणसात अशी भावना आहे की, लटके आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्या मार्गात अडथळे तयार केले जात आहेत. त्यामुळे लटकेंबद्दल सहानुभूती बघायला मिळत आहे. बाळासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष आणि चिन्हं शिंदे गटामुळे गोठवलं गेल्याचं चित्रं उद्धव ठाकरे यांच्याकडून दाखवलं जातं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटामध्ये एक संताप आहे, त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये बघायला मिळू शकेल. शिवाय काँग्रेसने आपला उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे काँग्रेसला गेल्या तीन निवडणुकीत मिळालेली सरासरी मतं बघितली तर तोही फायदा ऋतुजा लटकेंना होऊ शकेल. मुरजी पटेलांनी गेल्यावेळी कमळाचं चिन्ह नसतानाही अपक्ष उमेदवारीत 45 हजार मतं घेतली होती. त्यामुळे त्यांना कमी लेखता येणार नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget