एक्स्प्लोर

सरपंच हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग

मस्साजोग, ता. केज, जि. बीड येथील सरपंच श्री. संतोष पंडीतराव देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपरोक्त संदर्भ येथील शासन निर्णयान्वये विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे

मुंबई : बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला असून खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडलाही (Walmik Karad) पोलिसांनी अटक केलीआहे. तसेच, न्यायालयाने आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी दिली असून संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणातील फरार आरोपींचाही शोध घेतला जात आहे. आता, राज्य शासनाकडून संतोष देशमुख हत्येप्रकरणी एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वात ही समिती स्थापन करण्यात आली असून तेली यांच्यासह 10 जणांची टीम या घटनेचा सखोल तपास करणार आहे.  त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासला वेग येणार आहे. 

मस्साजोग, ता. केज, जि. बीड येथील सरपंच श्री. संतोष पंडीतराव देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपरोक्त संदर्भ येथील शासन निर्णयान्वये विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. सदर पथकात पोलीस अधिकारी व अंमलदार यांची नियुक्ती करण्याची बाब शासन विचाराधीन होती, त्यानुसार ही एसआयटी गठित करण्यात आल्याचं गृह विभागाने परिपत्रकातून म्हटलं आहे. 

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांच्या हत्येप्रकरणी केज पोलीस ठाणे, बीड येथे गु. र. क्र. ६३७/२०२४ भा.न्या.सं., कलम १४०(१), १२६(२), ११८(१), ३२४(४) (५), १८१(२), १९१(२), १९०, १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आयपीएस अधिकारी डॉ. बसवराज तेली (भा.पो.से.), पोलीस उपमहानिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा (EOW), सी.आय.डी., पुणे यांच्या अध्यक्षतेखाली "विशेष तपास पथक (SIT)" स्थापन करण्यात आले आहे. तसेच, बसवराज तेली यांनी शासनाकडे मागणी केल्यानुसार सदर विशेष तपास पथकामध्ये खालील काही अधिकारी व अंमलदार यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.

10 जणांची SIT टीम

आयपीएस अधिकारी डॉ. बसवराज तेली - पोलीस उपमहानिरीक्षक

अनिल गुजर - पो. उप अधीक्षक
विजयसिंग शिवलाल जोनवाल- स.पो. निरीक्षक
महेश विघ्ने - पो.उ.निरीक्षक
आनंद शंकर शिंदे- पो.उ.निरीक्षक
तुळशीराम जगताप - सहा. पो. उ. निरीक्षक
मनोज राजेंद्र वाघ - पोलीस हवालदार/१३
चंद्रकांत एस.काळकुटे - पोलीस नाईक /१८२६
बाळासाहेब देविदास अहंकारे - पोलीस नाईक/१६७३
संतोष भगवानराव गित्ते - पोलीस शिपाई/४७१

बसवराज तेली 2010 चे IPS अधिकारी

नागपूर शहर पोलीस उपायुक्त म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर बसवराज तेली यांच्याकडे सांगलीच्या पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यातआली होती. सन 2010 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले डॉ. तेली हे एमबीबीएस डॉक्टर असून ते मूळचे बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील खंदीबुद या गावाचे सुपुत्र आहेत. पोलीस दलातील त्यांच्या सेवेस महाराष्ट्रातील पाचोरा (जि.जळगाव) येथून झाली. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून, पुणे येथे शह उपायुक्त म्हणून काम केले. तर, सांगलीचे पोलीस अधीक्षकपदही सांभाळले होते, सध्या ते पोलीस उपमहानिरीक्षकपदावर कार्यरत आहेत. 

हेही वाचा

अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Embed widget