एक्स्प्लोर

डॉक्टरांच्या निवडणूक ड्युटीवरून राज ठाकरेंची वॉर्निंग; म्हणाले, तुम्हाला कामावरुन कोण काढतं तेच पाहतो!

Raj Thackeray : डॉक्टर काय मतदारांची नाडी बदलणार का?  नर्सेस मतदारांची डायपर बदलणार का? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे.

Raj Thackeray Speech : मनसेकडून आज गुढीपाडव्यानिमित्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या सुरुवातीलाच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) शिक्षण आणि डॉक्टरांना कामाला लावल्यावरून निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. 

राज ठाकरे म्हणाले की, जवळपास पाच वर्षानंतर महाराष्ट्रात निवडणुका होत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका आता होतील असे म्हणता म्हणता अजूनही होत नाहीत. त्यामुळे 2019 ला झालेल्या निवडणुकीनंतर 2024 साली निवडणुका होत आहेत. सगळे आचारसंहिता वाले जागे झालेत. काल मी बातमी वाचली की महापालिकेचे  जेवढे हॉस्पिटल आहेत. त्यातील डॉक्टर आणि नर्सेसला निवडणुकीच्या कामावर जुंपवले.  

ते डॉक्टर काय मतदारांची नाडी बदलणार का?  

ते डॉक्टर काय मतदारांची नाडी बदलणार का?  नर्सेस मतदारांची डायपर बदलणार? ज्यासाठी  त्यांची नेमणूक केलीय, ज्या रुग्णांसाठी त्यांची नेमणूक केली, तिथे ते नसावेत का? निवडणुका होणार आहेत ही गोष्ट निवडणूक आयोगाला प्रत्येक वेळेला माहिती असते.  त्यामुळे एक फळी का उभी नाही करत तुम्ही? असा सवाल त्यांनी निवडणूक आयोगाला विचारला.

तुम्हाला कामावरुन कोण काढतं तेच पाहतो

प्रत्येक वेळेला शालेय शिक्षक, नर्सेसची नेमणूक करायची. आता डॉक्टर्स घ्यायचे हे काय चाललंय. मी तुम्हाला आताच ज्या डॉक्टर आणि नर्सेसवर ही निवडणुकीची जबाबदारी टाकलेली असेल, तिथे त्यांनी जाऊ नये. ज्या रुग्णांची सेवा तुम्ही करताय तिथे तुम्ही जा, काम करा, तुम्हाला कोण काढतं ते मी बघतो, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. 

मी जे अपत्य जन्माला घातलंय, त्याच पक्षाचा मी अध्यक्ष राहीन

राज ठाकरे पुढे म्हणाले की, मी जे अपत्य जन्माला घातलंय, त्याच पक्षाचा मी अध्यक्ष राहीन. तसेच माझ्यात आणि भाजपमध्ये जागावाटपाची चर्चा झाली, अशाही बातम्या ऐकायला मिळत आहेत. मी जागावाटपाच्या चर्चेला शेवटचा 1995 मध्ये बसलो होतो, या वाटाघाटी करण्याचा संयम माझ्यात नाही. मी मनसेच्या रेल्वे इंजिन या चिन्हाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, असे त्यांनी सांगितले. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
ST Fare Hike : एसटीला दररोज तीन कोटींचा तोटा, भाडेवाढ अपरिहार्य, प्रताप सरनाईक यांनी वाचला कारणांचा पाढा
एसटीची भाडेवाढ आजपासूनच, टॅक्सी अन् रिक्षाची भाडेवाढ कधीपासून लागू, प्रताप सरनाईक यांनी तारीख सांगितली
Sanjay Raut : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
Bank Holidays February: फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule Uddhav Thackeray बिनडोक राजकारणी;त्यांच्यामुळे गद्दारीचं गालबोटसकाळी ११ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 24 January 2025ST Fare hike : ST ची आजपासून भाडेवाढ, परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांचा मोठा निर्णयNalasopara : अनधिकृत इमारतीवर कारवाई, रहिवाश्यांना बांबू, चादरी टाकून राहण्याची वेळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
ST Fare Hike : एसटीला दररोज तीन कोटींचा तोटा, भाडेवाढ अपरिहार्य, प्रताप सरनाईक यांनी वाचला कारणांचा पाढा
एसटीची भाडेवाढ आजपासूनच, टॅक्सी अन् रिक्षाची भाडेवाढ कधीपासून लागू, प्रताप सरनाईक यांनी तारीख सांगितली
Sanjay Raut : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
Bank Holidays February: फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
Sharad Pawar : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
FIR Against Shreyas Talpade: अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
मोठी बातमी! अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
Sharad Pawar : खरं म्हणलं तर हे काय कोल्हापूरचे संस्कार वाटत नाहीत, अमित शाह कोल्हापूरला शिकले की आणखी कुठं माहिती नाही : शरद पवार
अमित शाह यांचा टोन अतिटोकाचा, गृहमंत्र्यांकडून तारतम्यानं भाष्य अपेक्षित पण... शरद पवारांची टीका
Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुखांना 41 इंचाच्या गॅस पाईपने मारहाण केल्याचं उघड
Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुखांना 41 इंचाच्या गॅस पाईपने मारहाण केल्याचं उघड
Embed widget