एक्स्प्लोर

Mumbai Local : मुंबईत अतिमुसळधार! रेल्वे ट्रॅकवर पाणी भरलं, लोकल आणि एक्सप्रेस गाड्या बंद; प्रवाशांची स्टेशनवर गर्दी

Mumbai Rain : गेल्या तासाभरापासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर त्याचा फटका लोकल प्रवाशांना बसल्याचं दिसंयत. 

मुंबई : शहरात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसाचा फटका लोकल ट्रेनला बसला असून भांडुप ते कुर्ला दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याची माहिती आहे. त्यामुळे लोकल सेवा आणि एक्सप्रेस गाड्या या काही वेळआपासून बंद आहेत. तशा प्रकारची घोषणा दादर स्टेशनवर करण्यात आली आहे. पावसामुळे घाटकोपर स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं दिसतंय.

मुंबईत आज दिवसभर पावसाची हजेरी आहे. संध्याकाळच्या वेळी पावसाचा जोर वाढल्याने त्याचा परिणाम मुंबई लोकल सेवेवर झाल्याचं दिसलं.मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वे 30 ते 40 मिनिटे उशिराने धावत आहे तर पश्चिम रेल्वे 20 ते 30 मिनिटे उशिराने धावत आहे. विक्रोळी, कांजूर, भांडुप या स्टेशन दरम्यान पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे घाटकोपर स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं.  

घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचल्याने स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. गेल्या तासाभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे स्टेशन परिसरात पाणी साचलं आहे.

दरम्यान मुंबईत उद्याही अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शहर आणि उपनगरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. 

अंधेरी, गोरेगावमध्ये पावसाची बॅटिंग

मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली,दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे या सर्व परिसरात मुसळधार पाऊस पडला. मुंबईच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचल्याचं दिसतंय.

मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि मुंबईला देण्यात आलेल्या रेड अलर्टच्या इशाऱ्यानंतर  मुंबई महापालिका आयुक्तांनी सर्व उपयुक्तांना, वॉर्ड अधिकाऱ्यांना, अभियंत्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी  आणि कर्मचाऱ्यांनी  नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहून तातडीने आपल्या वॉर्डमध्ये  मुसळधार पावसामुळे काही अडचणी येत असतील तर त्या सोडवाव्यात. सर्व उपयुक्तांनी  आपल्याकडे दिलेल्या झोनमध्ये होत असलेल्या कामांवर आणि येत असलेल्या अडचणींवर विशेष लक्ष ठेवावे. जिथे जिथे पाणी साचत असेल तिथे पंपाने पाण्याचा निचरा तातडीने करण्यास  उपाययोजना कराव्यात. त्याशिवाय काही आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास तातडीने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी रात्रभर काम करावे व आपल्या कार्य कक्षेत विशेष लक्ष ठेवावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Priyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझाTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaUddhav Thackeray : बाळासाहेबांची रूद्राक्षाची माळ मी घराणेशाहीत घेतली - ठाकरेUddhav Thackeray : बाळासाहेबांचा जिव्हाळा असलेल्या शहरात झालेला गद्दाराचा विजय खटकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
Sharad Pawar : 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
×
Embed widget