Mumbai Crime : दोघांच्या संमतीने संबंध, तो अंगावर टॅटूही काढणार होता, मला तो 'किकी पुकी' म्हणायचा, मुंबईतील अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षिकेचा दावा
Mumbai Crime : विद्यार्थी तिला मेसेजमध्ये पत्नी म्हणून संबोधत होता, असेही तिने अर्जात म्हटले आहे. प्रेमाने तो आपल्याला 'किकी, पुकी' म्हणायचा, असा दावा देखील तिने केला असल्याची माहिती आहे.

मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक (Mumbai Crime News) घटना समोर आली होती. एका नामांकित शाळेतील इंग्रजी शिक्षकाला अल्पवयीन विद्यार्थ्याशी शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. शिक्षिकेने विद्यार्थ्याचे अनेक वेळा लैंगिक शोषण (Mumbai Lady Teacher Assaults Minor School Student) केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याशिवाय, ती त्याला दारू पाजायची आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जायची तिथे ती त्याचे शोषण करायची. या प्रकरणी आता या आरोपी शिक्षिकेने जामिनासाठी अर्ज केला आहे, विद्यार्थी आणि शिक्षिका या दोघांमधील संबंध हे परस्पर संमतीने होते, असा दावा या जामिनासाठी दिलेल्या अर्जात म्हटलं आहे. विद्यार्थी तिला मेसेजमध्ये पत्नी म्हणून संबोधत होता, असेही तिने अर्जात म्हटले आहे. प्रेमाने तो आपल्याला 'किकी, पुकी' म्हणायचा, असा दावा देखील तिने केला असल्याची माहिती आहे.(Mumbai Lady Teacher Assaults Minor School Student)
या प्रकरणातील आरोपी शिक्षिकेने गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला याचिका दाखल केली होती. विशेष पोक्सो न्यायाधीश सबिना मलिक यांनी तपास अधिकारी आणि तक्रारदार यांना सोमवारी त्यांचे उत्तर सादर करण्यास सांगितले. त्यानंतर युक्तिवाद सुरू होतील. दादर पोलिसांना पिडीत अल्पवयीन मुलाने आणि त्याच्या कुटूंबातील सदस्यांनी दिलेल्या तक्रारीत, अल्पवयीन विद्यार्थ्याने आरोप केला आहे की आरोपी शिक्षिका गेल्या एक वर्षापासून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करत होती. त्याला पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जायची आणि दारु पाजल्यानंतर जबरदस्तीने त्याच्यासोबत लैंगिक संबंध ठेवत होती.
तो तिच्या प्रेमात वेडा अन् अंगावर टॅटू...
शिक्षिकेने या संपूर्ण प्रकरणात युक्तिवाद केला आहे की, तो मुलगा "तिच्या प्रेमामध्ये वेडा आहे" आणि त्याला तिच्या नावाचा टॅटू आपल्या शरीरावर विशिष्ट ठिकाणी काढायचा होता. तिने त्या शाळेतून राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर तो तिला वारंवार समजावत होता, असेही तिने म्हटले आहे.
शिक्षिकेने केलेल्या दाव्यानुसार मुलाच्या पालकांनी त्याला खटला दाखल करण्यास भाग पाडले आहे. त्याच्या आईला दोघांच्या नात्याबद्दल आधीच माहिती होती. तिने मुलाचा फोन आणि लॅपटॉप काढून घेतला होता, जेणेकरुन ते दोघे संवाद साधू शकणार नाहीत. शिक्षिकेने सांगितले की मुलगा काही महिन्यांतच वयाची 18 वर्ष पूर्ण करुन सज्ञान होणार होता. मात्र परिस्थिती समजून घेण्याइतका प्रौढ आहे, हेही तिने सांगितले आहे.
शिक्षिकेने सांगितले की तिच्याकडून कोणतीही धमकी किंवा जबरदस्ती त्याच्यावरती झालेली नव्हती. तिने आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी दोघांमध्ये झालेल्या ईमेल आणि मेसेजचा दाखला दिला आहे. तिने दावा केला की तो मुलगा तिला भेटण्याचा आग्रह करत होता परंतु काही काळानंतर, तिनेच त्याला आपल्या आईची परवानगी घेण्यास सांगितले होते.
कधी झाली सुरूवात?
शिक्षिका 40 वर्षांची असल्याचे सांगितले जाते आणि ती विवाहित आहे. तिला एक मूल देखील आहे. तर, पीडित विद्यार्थी 11 वीत शिकत होता आणि तो 16 वर्षांचा होता. तक्रारीत म्हटले आहे की, डिसेंबर 2023 मध्ये हायस्कूलच्या वार्षिक कार्यक्रमादरम्यान एका ती विद्यार्थ्याच्या अनेक वेळा संपर्कात आली. त्यानंतरच ती त्याच्याकडे आकर्षित झाली. जानेवारी 2024 मध्ये तिने पहिल्यांदाच विद्यार्थ्याला नात्यासाठी विचारणा केली. सुरुवातीला विद्यार्थ्याने अंतर राखण्यास सुरुवात केली. त्यानंतर, शिक्षकाने शाळेतील तिच्या एका महिला मैत्रिणीची मदत घेतली आणि प्रकरण पुढे नेलं. या प्रकरणी महिला मैत्रिणीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिने पीडित विद्यार्थ्याला सांगितले की ते एकमेकांसाठी बनले आहेत आणि वयस्कर महिला आणि मुलांमधील संबंध सामान्य आहेत.
एका मित्राशी बोलल्यानंतर, विद्यार्थ्याने शिक्षिकेला भेटण्याचा निर्णय घेतला. एका अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, 'ती (शिक्षिका) विद्यार्थ्याला तिच्या कारमधून एका निर्जन ठिकाणी घेऊन गेली आणि जबरदस्तीने त्याचे कपडे काढले आणि त्याचा विनयभंग केला.' तो म्हणाला, 'पुढील काही दिवसांत, विद्यार्थ्याला त्रास होऊ लागला, म्हणून त्याला तिने गोळ्याही दिल्या.' यानंतर, शिक्षिका विद्यार्थ्याला दक्षिण मुंबईतील वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जाऊ लागली. त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पोलिसांनी सांगितले की, शिक्षकाने अनेक वेळा विद्यार्थ्याशी लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी त्याला दारू पाजली.























