एक्स्प्लोर

Gokhale Bridge : अंधेरीतील गोखले पुलाची एक बाजू फेब्रुवारीपर्यंत सुरू होणार, महापालिका आणि पश्चिम रेल्वेच्या बैठकीत निर्णय

Mumbai Andheri Gokhale Bridge: गोखले पुलाच्या गर्डर कामासाठीच्या नियोजन बैठकीत बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पश्चिम रेल्वेच्या संयुक्त उच्चपदस्थ बैठकीत निर्णय झाला आहे. 

मुंबई: अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाची (Andheri Gokhale Bridge) एक बाजू 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत वाहतुकीसाठी खुली करण्याच्या दृष्टीने बैठक पार पडली. गोखले पुलाच्या रेल्वेवरील भागात गर्डर लॉंचिंग करण्याच्या अनुषंगाने पश्चिम रेल्वेमार्फत ब्लॉकसाठी अधिक कालावधी मिळावा अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना केली. सदर ब्लॉकसाठी अधिक कालावधी देण्यासाठी पश्चिम रेल्वेकडूनही दुजोरा देण्यात आला.  

गोखले पुलाच्या पहिल्या गर्डरचे लॉंचिंगचे काम हे अत्यंत जिकिरीचे असल्या कारणाने सदर बैठक आमदार अमित साटम यांच्या सूचनेनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी बोलावली होती. सदर बैठकीत गोखले पुलाच्या सद्यस्थितीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. सदर कामासाठी राईट्स कंपनीकडून कार्यवाही होत आहे. गोखले पुलाच्या गर्डरचे लॉंचिंग करणे,  गर्डर उत्तरेकडे सरकवणे आणि पूलाचा गर्डर सरकवल्यानंतर 7.5 मीटर खाली सुमारे 1300 टन वजनी आणणे हे अत्यंत कौशल्यपूर्ण काम हे राईट्स या सल्लागार कंपनीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. 

पहिल्या गर्डरचे काम हे अत्यंत जोखमीचे असल्याने हे काम अतिशय काळजीपूर्वक करण्याची जबाबदारी राईट्स या कंपनीने घेतली आहे. गोखले पुलाचे काम हे वेगाने व्हावे म्हणून राईट्स कंपनीद्वारे या पुलाच्या रेल्वेच्या भागातील लॉंचिंगसाठी किती आणि कधी ब्लॉक घ्यावेत, याबाबतची विस्तृत चर्चा आजच्या बैठकीत करण्यात आली. पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी निर्देश दिले की, गोखले पुलाच्या गर्डर लॉंचिंगसाठी लागणारे एकंदरीत ब्लॉक आदी इत्थंभूत माहिती व त्याबाबतचे रेखाचित्र रेल्वे प्रशासनाला लवकरात लवकर सादर करण्यात यावेत.  

एखाद्या पुलाच्या कामात 7.5 मीटर उंचीवरून गर्डर खाली आणणे हा भारतातला पहिलाच प्रकल्प आहे. त्यामुळे सदर तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीच्या बाबतीत अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. रेल्वेच्या साधारणपणे एक तासाच्या ब्लॉकमध्ये गर्डर फक्त 15 सेंटीमीटर इतकाच खाली आणता येईल. त्यामुळे गोखले पुलाच्या या अवाढव्य 1300 टन वजनी गर्डरकरिता 7.5 मीटर खाली उतरवण्याच्या कामासाठी लागणारा कालावधी हा अधिक असू शकतो. म्हणूनच रेल्वेचा ब्लॉकचा कालावधी वाढवून मिळावा अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना केली. पश्चिम रेल्वेमार्फतही महानगरपालिकेच्या या मागणीला दुजोरा देण्यात आला आहे. 

एकदा गर्डर खाली आणून स्थापन केल्यानंतर त्यावर सळ्या अंथरून सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यात येईल. पुलाचे क्युरींगचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर मास्टिकचे काम पूर्ण करण्यात येईल. ही सर्व कामे क्रमाने झाल्यानंतरच पूल एका दिशेच्या वाहतुकीसाठी खुला करणे शक्य होईल. गोखले पुलासाठी विविध टप्प्यातील होणारी कामे पाहता बृहन्मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात येते की, गोखले पुलाच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही. तसेच एकंदरीतच पुलासाठी आवश्यक असलेल्या सर्व कामांच्या पूर्ततेचा कालावधी पाहता पूलाची एका दिशेची वाहतूक खुली करण्यासाठी 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत  कालावधी अपेक्षित असल्याचे महानगरपालिका, राईट सल्लागार आणि रेल्वे प्रशासनाकडून आजच्या बैठकीत संयुक्तिकपणे स्पष्ट करण्यात आले. 

अंधेरी येथील गोपालकृष्ण गोखले पुलाचा पहिला गर्डर स्थापन करण्यासह पुलाच्या इतर कामांची प्रगती जाणून घेण्याच्या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी नुकतीच प्रत्यक्ष प्रकल्प स्थळी भेट देवून पाहणी केली होती. गोखले पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामध्ये कोणताही विलंब होवू नये, तसेच अवाढव्य गर्डर स्थापन करण्याची सगळी कामे महानगरपालिका आणि रेल्वेच्या समन्वयातून अचूकपणे पार पडावीत, यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू आणि त्यांची प्रशासन प्रारंभापासून प्रयत्न करीत आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravi Ashwin : वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
Ravichandran Ashwin : अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
R Ashwin : आर. अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Nagpur : दोन दिवसांनंतर अजित पवार आज सभागृहात जाणारAmol Mitkari Nagpur : अजित पवार आणि शशिकांत शिंदेंच्या भेटीवर अमोल मिटकरी काय म्हणाले?Suresh Dhas Meet Ajit Pawar:त्या 6-7 जणांचा आका कोण आहे? त्या आकांचा आका कोण?धस यांचा निशाणा कुणावर?MVA Government : मविआ काळात फडणवीस, शिंदेंना अटक करण्याच्या कटाचा तपास SIT मार्फत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravi Ashwin : वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
Ravichandran Ashwin : अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
R Ashwin : आर. अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
कॅन्सरग्रस्त 70 वर्षीय शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल गेल्या 23 दिवसांपासून फक्त पाण्यावर, शरीरातील अनेक अवयव निकामी होण्याची भीती
कॅन्सरग्रस्त 70 वर्षीय शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल गेल्या 23 दिवसांपासून फक्त पाण्यावर, शरीरातील अनेक अवयव निकामी होण्याची भीती
Astrology : यंदाची संकष्टी चतुर्थी 3 राशींसाठी ठरणार खास; 18 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
संकष्टी चतुर्थी 3 राशींसाठी ठरणार खास; 18 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Embed widget