Astrology : यंदाची संकष्टी चतुर्थी 3 राशींसाठी ठरणार खास; 18 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Astrology 18 December 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, 18 डिसेंबरपासून (Sankashti Chaturthi 2024) अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल.
Astrology 18 December 2024 : वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi 2024) आज, म्हणजेच 18 डिसेंबर रोजी आहे. याच दिवशी अनेक ग्रहांच्या देखील चाली बदलत आहेत. बुद्धिमत्ता, वाणी आणि व्यवसायाचा कारक मानल्या जाणाऱ्या बुध ग्रहाने वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. जानेवारी 2025 पर्यंत बुध याच राशीत राहील. याशिवाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लक्ष्मी योगासह इंद्र योग जुळून आला आहे. या संयोगामुळे 18 डिसेंबरपासून 3 राशींचं नशीब उजळेल, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
बुध सरळ चालीत मार्गी होत असल्याचा चांगला फायदा मिथुन राशीला होणार आहे. या काळात मिथुन राशीच्या लोकांना कर्जापासून मुक्ती मिळू शकते. कोणताही प्रकल्प अपूर्ण असेल तर त्यात यश मिळेल. व्यवसायात गती येईल आणि नवीन कामही सुरू होऊ शकेल.नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. पोटाशी संबंधित समस्या संपतील आणि मन शांत राहील. घरातील वातावरणही आनंदी राहील. गणेशाची आराधना करा, यामुळे उत्पन्न आणि सौभाग्य वाढेल.
मकर रास (Gemini)
मकर राशीच्या लोकांसाठी बुधाची सरळ चाल खूप शुभ ठरू शकतो. या काळात तुमचं उत्पन्न वाढेल. घर किंवा वाहन घेण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांसाठीही हा काळ चांगला राहील. शेअर बाजार, गुंतवणूक आणि लॉटरीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रत्येक प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंबातील वातावरण सरकारात्मक राहील. घरातील भांडण-तंटे सुटतील.
कुंभ रास (Gemini)
कुंभ राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होईल. व्यवसायात तेजी येईल, प्रतिस्पर्ध्यांना चांगली टक्कर द्याल. या काळात तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील. गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल, पण मकर संक्रांतीच्या नंतर नवीन काम सुरू करा. करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे. बुधाची कृपा योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. भगवान शंकराची आराधना करा आणि गंगाजलात दुर्वा मिसळून अभिषेक केल्याने विशेष फळ मिळेल. व्यवसाय आणि जीवनात याचा फायदा होईल.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :