एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?

Chhagan Bhujbal displeasure: अजित पवारांनी कॅमेऱ्यासमोर चकार शब्द काढला नाही, सुनील तटकरेंचं भुजबळांबद्दल महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...

मुंबई: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून नाराज असलेल्या छगन भुजबळ यांची समजूत काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत स्तरावर हालचाली सुरु असल्याची माहिती आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी आम्ही योग्यवेळी छगन भुजबळ यांना भेटायला जाऊ असे सांगितले. छगन भुजबळ हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. पण ते मंत्रिमंडळात नाहीत ही वस्तुस्थिती खरी आहे. त्यांची नाराजू दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असे तटकरे यांनी म्हटले. ते बुधवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मी स्वत: पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्याशी बोललो आहे. सध्या मी आणि प्रफुल पटेल अधिवेशनामुळे दिल्लीत आहोत. तर नागपूरमध्येही हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यानंतर योग्य वेळ पाहून आम्ही छगन भुजबळ यांना भेटायला जाऊ. सुरुवातीच्या काळात प्रफुल पटेल यांनी भुजबळांशी चर्चा केली होती. लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, उमेदवारी जाहीर करण्यास उशीर झाला ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांनी स्वत:च माघार घेत असल्याचे जाहीर केले. लोकसभा निवडणुकीत जागावाटप आणि उमेदवारांची घोषणा यामुळे महायुतीला फटका बसला, ही वस्तुस्थिती आहे, असे स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिले.

अजित पवार हे अर्थखात्यासाठी अडून बसल्यामुळे खातेवाटप जाहीर होण्यास विलंब होत असल्याच्या बातम्या कपोलकल्पित आहेत. अजित पवार यांची तब्येत ठीक नसल्याने ते दोन दिवस अधिवेशनाला आले नव्हते. उद्या नागपूरच्या रेशीम बागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिकाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जाणार की नाही, याबाबत मला माहिती नसल्याचेही सुनील तटकरे यांनी म्हटले.

छगन भुजबळांची प्रतिक्रिया

छगन भुजबळ यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, तुमच्याद्वारे मला लोकांपर्यंत एवढंच पोहोचवायचे आहे की, कोणीही अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारु नयेत किंवा त्यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरु नये.  यापुढे जो कोणी हे करेल, तो समता परिषदेचा सभासद नाही, असे मानले जाईल. यावेळी भुजबळांना तटकरे यांच्या वक्तव्याविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर छगन भुजबळ यांनी मौन बाळगणे पसंत केले.

सुनील तटकरेंचा निर्वाणीचा इशारा

छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये त्यांच्या समर्थकांकडून आंदोलन करण्यात आले होते. यावेळी अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले होते. याविषयी सुनील तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली.  जोडे मारो आंदोलन बिलकुल सहन केले जाणार नाही. जे कार्यकर्ते असं करत आहेत, त्यांचा अहवाल मागितला आहे. पक्षाकडून अशा कुठल्याही गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. हा भुजबळ यांच्यासाठी इशारा नाही, तर जे पदाधिकारी अस करत आहेत त्यांना सूचना आहेत, असे सुनील तटकरे यांनी म्हटले.

आणखी वाचा

मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळांचे शा‍ब्दिक हल्ले; अजित पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

महत्त्वाच्या बातम्या

जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय झाली चर्चा? शरद पवारांचा पक्ष खरचं NDA मध्ये सामील होणार का?
जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय झाली चर्चा? शरद पवारांचा पक्ष खरचं NDA मध्ये सामील होणार का?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आज जयंत पाटील एकनाथ शिंदेच्या भेटीला, नंदनवन निवासस्थानी मोठी खलबतं 
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आज जयंत पाटील एकनाथ शिंदेच्या भेटीला, नंदनवन निवासस्थानी मोठी खलबतं 
तीन तिघाडा, काम बिघाडा! मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मंत्रीच पाळत नाहीत तर, मग प्रशासन काय पाळणार? नाना पटोलेंचा हल्लाबोल 
तीन तिघाडा, काम बिघाडा! मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मंत्रीच पाळत नाहीत तर, मग प्रशासन काय पाळणार? नाना पटोलेंचा हल्लाबोल 
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
Embed widget