Manoj Jarange Patil and Maharashtra Government : सरकारचा अॅटिट्यूड एका दिवसात बदलला, वार उलटं फिरलं, मनोज जरांगे अडचणीत कसे सापडले?
Manoj Jarange Patil and Maharashtra Government : सरकारची (Government)बॉड लँग्वेज पूर्णपणे बदललीय. आज अधिवेशनाचा पहिला दिवस कामकाजाशिवाय पार पडला. मात्र, त्यातही आरक्षण आंदोलनावरुन किती गोंधळ होणारय हे लक्षात येतं.
Manoj Jarange Patil and Maharashtra Government : सरकारची (Government)बॉड लँग्वेज पूर्णपणे बदललीय. आज अधिवेशनाचा पहिला दिवस कामकाजाशिवाय पार पडला. मात्र, त्यातही आरक्षण आंदोलनावरुन किती गोंधळ होणारय हे लक्षात येतं. सकाळी सभागृहाबाहेर विरोधकांनी जोरदार बॅनरबाजी करत, आरक्षणावरुन सरकारला धारेवर धरलं. पण, सत्ताधाऱ्यांनाही फ्रंटफूटवर येण्याची संधी मिळालीय. कारण, मनोज जरांगेंनी (Manoj Jarange Patil) केलेली जातीवाचक वक्तव्य केली. त्यावरुन फक्त राजकारणच नाही तर समाजकारणही बदलून जाणार आहे. शिवाय, मराठा तरुणांसमोरही एक संभ्रम निर्माण झालाय. मराठा समाजाचा आवाज बनलेल्या जरागेंनाच आज मराठा समाजातून विरोध सुरु झालाय आणि त्याला काय कारण आहे जाणून घेऊयात.
मुंबईच्या वेशीवर आरक्षणाचा गड सर केल्याचा जल्लोष केला. त्यानंतर विधिमंडळात मराठा समाजाला स्वतंत्रपणे जाहीर झालेलं आरक्षण त्याचा गावोगाव होणारा जल्लोष हाच जल्लोष थांबण्याआधीच मनोज जरागेंनी उधळलेला आंदोलनाचा गुलाल आणि त्यातून निर्माण झालेली मराठा आंदोलनातली सर्वात मोठी फूट पडली आहे.
सहकाऱ्यांकडून मनोज जरांगेंवर आरोप
एरवी शेकडो कार्यकर्त्यांचा वेढा, जेसीबी भरून फुलं झेलण्याची सवय चहूबाजूनं कौतुकाचा वर्षांव मराठा तरुणांच्या गळ्यातलं ताईत बनलेल्या मनोज जरांगेंना आता मात्र, आरोपांचा सामना करावा लागतोय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आरोपांच्या फैरी दुसरं तिसरं कोणी नाही तर त्यांचेच कधीकाळचे सहकारी करातायेत. 20फेब्रुवारीला मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळात मंजूर झालं. तरीही जरांगेंनी तीव्र नापसंती दर्शवली. आंदोलन तीव्र करण्याचं जाहीर केलं. आणि दुसऱ्यादिवशीच सकाळी २१ जानेवारीला आंदोलनात फूट पडल्याचं उघड झालं. एकेकाळचे सहकारी अजय महाराज बारसकर यांनी जरांगेंवर तोफ डागली. त्यांचे जरांगेंवरचे आरोप आजही कायम आहेत.
बारसकर सरकारचाच माणूस - जरांगे पाटील
तर त्यावर जरांगे भडकले.त्यांनी बारसकरांना सरकारचाच माणूस आहे. आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचलाय,असं म्हणत आजवर स्वतःजवळ असणाऱ्या अजय बारसकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप असल्याचा दावा केलाय. दुसऱ्याच दिवशी आंदोलनात आणखी एक फूट पडली. मराठा आरक्षण कार्यकर्त्या संगीता वानखेडे यांनी थेट शरद पवारांचं नाव घेत जरांगेंवर आरोप केले. जालना जिल्ह्यातील बाबुराव वाळेकर यांनी देखील मनोज जरांगेंवर गंभीर आरोप केले.
मनोज जरांगेंचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
तिघांचेही जवळपास एकसूरी आरोप केले. इतके दिवसं कौतुकाची गाणी ऐकणाऱ्या जारांगेंना आता मात्र शरद पवार आणि सहकाऱ्यांच्या इशाऱ्यावर चालणारे म्हणून कडव्या विरोधाचा पाढा ऐकू येवू लागलाय. आणि याच विरोधाच्या पाढ्याचं उत्तर देत असताना मनोज जरागेंनी आक्रमकतेच्या नादात टीकेचा स्वर बदललाय. आता मात्र शिवीगाळ, जातीवाचक, प्रक्षोभक भाषेमुळे मराठा तरुणांच्या गळ्यातलं ताईत बनलेल्या जारांगेंनी मात्र त्याच सुसंस्कृत मराठा तरुणांना मात्र संभ्रमावस्थेत टाकलंय. आणि तोच संभ्रम दूर करण्याचे आव्हान जरांगेंसमोर आहे.
इतर महत्वाच्या बातम्या