एक्स्प्लोर

अटल सेतूमुळे 60 टक्के मच्छी कमी झाली, नुकसानभरपाई मागत मच्छिमार संघटनेची हायकोर्टात याचिका

Mumbai Atal Setu : मुंबईला नवी मुंबईशी जोडणाऱ्या अटल सेतूचं बांधकाम सुरु झालं तेव्हापासूनच येथील समुद्रातून मच्छी कमी होत गेली, असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.

मुंबई : अटल सेतूमुळे वाशी खाडीतील 60 टक्के मच्छी कमी होऊन त्याचा मासेमारीवर थेट परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यावर अवलंबून असणाऱ्या मच्छिमारांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. मरी आई मच्छिमार सहकारी संस्थेच्यावतीनं दाखल ही याचिका न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला व न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठानं यावर 28 ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्याचं स्पष्ट केलं आहे.

मासेमारी हा आमचा पारंपारिक व्यवसाय आहे. गेली अनेक वर्षे आम्ही याच खाडीत मासेमारी करत आहोत. मासेमारी हेच आमच्या उत्पन्नाचं स्त्रोत आहे. मात्र अटल सेतूमुळे आमच्या उपजिवेकवर परिणाम झाला आहे. मुंबईला नवी मुंबईशी जोडणाऱ्या या 21.8 किमी पुलाचं बांधकाम साल 2018 पासून सुरु झालं. तेव्हा पासूनच येथील समुद्रातून मच्छी कमी होत गेली, असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.

काय आहे याचिका?

वाशीगाव, जुहूगाव, कोपरखैराणे, घणसोली, गोठीवली, दिवा व बेलापूर येथील कोळीवाड्यांच्यावतीनं ही याचिका दाखल झाली आहे. येथील मच्छिमारांच्या उपजिवेकेवर अटल सेतूचा थेट फटका बसला आहे. मात्र केवळ अटल सेतूच्याजवळ असलेल्या कोळीवाड्यांनाच नुकसानभरपाई देण्यात आली. नुकसानभरपाईच्या धोरणानुसार आम्हालाही ती मिळायलाच हवी, अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

अटल सेतूमुळे संघटनेच्या मच्छिमारांचं सुमारे 50 टक्के उत्पन्न घटलं आहे. त्यामुळे त्यांना नुकसानभरपाई मिळायला हवी, असं खुद्द मासेमारी विभागानं कबूल केलं होतं. त्यांचं उत्पन्न कसं घटत गेलं?, याचा आलेखही मासेमारी विभागानं जारी केला होता. मात्र नुकसानभरपाई काही देण्यात आली नाही. त्यामुळे संविधानानं दिलेल्या समानतेच्या अधिकारावरच गदा येत असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे.

ही बातमी वाचा : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSalman Khan Threat Message :  बिश्णोई गँगकडून सलमान खानला पुन्हा धमकीABP Majha Headlines :  8 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLaxman Hake on Car attack : हाकेंच्या गाडीवर हल्ला; पोलीस ठाण्याला घेराव घालण्याचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Singham Again Box Office Collection Day 7: आठवडा उलटूनही 200 कोटींचा टप्पा ओलांडू शकला नाही 'सिंघम अगेन'; भांडवलं तरी वसूल होणार?
आठवडा उलटूनही 200 कोटींचा टप्पा ओलांडू शकला नाही 'सिंघम अगेन'; भांडवलं तरी वसूल होणार?
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Embed widget