एक्स्प्लोर

चैत्यभूमीवरील अखंड भीमज्योतीचं अनावरण

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ज्योत भारतीयांच्या नेहमी मनात तेवत राहावी यासाठी मुंबईत चैत्यभूमी परिसरात या अखंड ज्योत लावण्यात आली आहे.

मुंबई : देशातल्या दुसऱ्या अखंड प्रज्वलित राहणाऱ्या भीमज्योतीचं आज दादरच्या चैत्यभूमी परिसरात अनावरण करण्यात आलं. खासदार रामदास आठवले यांच्या हस्ते आज सकाळी अखंड भीमज्योतीचं अनावरण झालं. दादर इथल्या चैत्यभूमी परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मृती जपण्यासाठी ही भीमज्योत उभारण्यात आली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ज्योत भारतीयांच्या नेहमी मनात तेवत राहावी यासाठी मुंबईत चैत्यभूमी परिसरात या अखंड ज्योत लावण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वतीने अखंड प्रज्वलित राहणारी देशातील पहिली ज्योत मुंबईतल्या ओव्हल मैदान परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर तीन महिन्यांपूर्वी बसवण्यात आली आहे. त्या पाठोपाठ आता दुसरी अखंड भीमज्योत ही दादर इथल्या चैत्यभूमी परिसरात बसवण्यात आली आहे. महापालिकेने उभारली भीमज्योत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे याबाबत मागणी केली होती. त्यानंतर सामाजिक न्यायमंत्र्यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याबरोबर बैठका घेऊन हे काम महापालिकेच्या निधीतून करण्याचं ठरवलं. महापालिका वास्तुविशारदांकडून भीमज्योतीचा आराखडा करण्यात आला आणि त्यानुसार निविदा मागवण्यात आल्या. या भीमज्योतीसाठी महापालिकेला 21 लाख 54 हजार रुपये खर्च आला आहे. तर, चैत्यभूमी परिसराच्या सुशोभीकरणासाठी आणि अन्य बाबींसाठी 42 लाख 74 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. सव्वा आठ फूट उंच साडेसात फूट रुंद भीमज्योत चैत्यभूमीवरील भीमज्योत सव्वा आठ फूट उंच आणि साडेसात फूट रुंद आहे. तेवणाऱ्या ज्योतीचा भाग बिडाच्या धातूपासून बनवण्यात आला आहे. आठ मिमी काचेच्या आवरणाआड ही ज्योत सतत तेवत राहिल. या ज्योतीला महानगर गॅसतर्फे 24 तास अखंड गॅस पुरवठा केला जाईल. तथागत गौतम बुद्धांचा, 'अत्त दीप भव' म्हणजेच स्वयंप्रकाशित व्हा हा प्रेरणादायी संदेश वेगळ्या अर्थाने अनुयायांना देण्यासाठी ही भीमज्योत उभारण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
Kartiki Gaikwad Pregnancy News :  'लिटिल चॅम्प'च्या घरी इवलुशा पावलांनी आला पाहुणा; कार्तिकी-रोनित झाले आई-बाबा
'लिटिल चॅम्प'च्या घरी इवलुशा पावलांनी आला पाहुणा; कार्तिकी-रोनित झाले आई-बाबा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Chanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचा वेगवान आढावा : 14 April 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 04 PM : 14 May  2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : मुस्लिम धार्जिणी पार्टी म्हणजे उ.बा.ठा, फडणवीसांचा हल्लाबोलDevendra Fadnavis on Nashik : नाशिकच्या जागेवर नेमकं काय घडलं? फडणवीसांनी सांगितली INSIDE STORY

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
Kartiki Gaikwad Pregnancy News :  'लिटिल चॅम्प'च्या घरी इवलुशा पावलांनी आला पाहुणा; कार्तिकी-रोनित झाले आई-बाबा
'लिटिल चॅम्प'च्या घरी इवलुशा पावलांनी आला पाहुणा; कार्तिकी-रोनित झाले आई-बाबा
Marathi Serial Update Zee Marathi Bharat Jadhav : भरत जाधवचे टीव्ही मालिकेत कमबॅक,  'या' मालिकेत साकारणार खलनायकी भूमिका
भरत जाधवचे टीव्ही मालिकेत कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार खलनायकी भूमिका
शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
संजिव गोयंका अन् राहुलमध्ये काय चर्चा झाली, लखनौच्या प्रशिक्षकाचा मोठा खुलासा
संजिव गोयंका अन् राहुलमध्ये काय चर्चा झाली, लखनौच्या प्रशिक्षकाचा मोठा खुलासा
शरद पवारांबद्दलचं ते वाक्य मनाला लागलं अन् अजितदादांनी पहाटेची शपथ घेतली; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
शरद पवारांबद्दलचं ते वाक्य मनाला लागलं अन् अजितदादांनी पहाटेची शपथ घेतली; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
Embed widget