एक्स्प्लोर

'शिंदेंनी माझ्या कानात जरी सांगितलं असतं तर मीच उद्धवजींशी बोलून मुख्यमंत्री केलं असतं'; अजितदादांची टोलेबाजी अन् हशा

Ajit Pawar :कोरोनामुक्त होऊन आज विधानसभेत आलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार जोरदार फार्मात दिसले. पहिल्याच दिवशी फुल्ल बॅटिंग करताना अजित पवारांनी अनेक शाब्दिक षटकार लगावले.

Ajit Pawar In Maharashtra Speaker Assembly Session : कोरोनामुक्त होऊन आज विधानसभेत आलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार जोरदार फार्मात दिसले. पहिल्याच दिवशी फुल्ल बॅटिंग करताना अजित पवारांनी अनेक शाब्दिक षटकार लगावले. विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर त्यांचं अभिनंदन करताना अजितदादा बोलत होते. यावेळी त्यांनी नार्वेकरांचं अभिनंदन केलं शिवाय सत्ताधाऱ्यांवर जोरदार टोलेबाजी केली. अजित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात सांगितलं असतं की अडीच वर्ष झालीत, आता मला तिथं बसायचंय. तरी आम्ही तुम्हाला तिथं बसवलं असतं. काही प्रॉब्लेम झाला नसता. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांना कोट करत 'नसता आला ना प्रॉब्लेम' असं विचारलं. यावरही सभागृहात हशा पिकला. 

भाजपची काही मंडळी रडायला लागली, गिरीश महाजनांचं रडणं बंद होईना

अजित पवार म्हणाले की,  देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा करताच पिनड्रॉप सायलेन्स होता. भाजपची काही मंडळी रडायला लागली. गिरीश महाजनांचं रडणं बंद होईना. फेटा बांधायला दिला तर डोळ्याचं पाणी पुसायला वापरायले. भाजपच्या आमदारांनी सांगावं की खरंच झालं ते कसं झालं. हे जे घडलंय त्यानं समाधान झालंय का हे सांगावं.  चंद्रकांत दादा पाटील तुम्ही बेंच वाजवू नका तुम्हालाच मंत्रीपद मिळत की नाही. सभागृहात धाकधूक आहेत. शिवसेनेतून गेलेले 40 जणांपैकी किती जणांना मंत्रीपद मिळेल माहिती नाही.

मला मूळ भाजपवाल्यांचं वाईट वाटतं

अजित पवार म्हणाले की, मी जेव्हा समोरच्या बाजूला पाहतो तर मूळ भाजपवाले कमी दिसतात. आमच्याकडची लोकं जास्त दिसतात. मला मूळ भाजपवाल्यांचं वाईट वाटतं. पहिली लाईन पाहिली तरी लक्षात येईल. गणेश नाईक, उदय सामंत, बबन पाचपुते, रादाकृष्ण विखे पाटील हे पहिल्या लाईनमध्ये आहेत. आमच्याकडून गेलेले दीपक केसरकर तर आज एकदम भारी प्रवक्ते झाले आहेत, आम्ही शिकवलेलं कुठं वाया गेलं नाही हे दिसतंय, असं अजित पवार यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. 

नार्वेकर ज्या पक्षात जातात त्या नेतृत्वाला ते आपलंसं करतात

अजित पवार म्हणाले की, नार्वेकर ज्या पक्षात जातात त्या नेतृत्वाला ते आपलंसं करतात.  शिवसेनेत गेल्यावर आदित्य ठाकरे यांना आपलंसं केलं.  आमच्याकडे आल्यावर मला आपलंसं केलं. भाजपमध्ये गेल्यावर देवेंद्र फडणवीस यांना आपलंसं केलं. आता एकनाथ शिंदे तुम्ही यांना आपलंसं करा नाही तर काही खरं नाही, असं अजित पवार म्हणाले. पवार म्हणाले की, नार्वेकर आमचे जावई आहेत. आतापर्यंत आम्ही जावयाचे हट्ट पुरा पुरवायचो. आता त्यांनी आमचा हट्ट पुरवला पाहिजे. जावयांनी सासरचा हट्ट पुरवला पाहिजे, असं ते म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai New Mantralay: मुंबईत सरकारचा नवा पत्ता! एअर इंडिया इमारतीच्या 23 व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय तर 22 व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल; कसे असेल नवीन मंत्रालय, Video
मुंबईत सरकारचा नवा पत्ता! एअर इंडिया इमारतीच्या 23 व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय तर 22 व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल; कसे असेल नवीन मंत्रालय, Video
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Mumbai Crime News: मुंबईतील टायगर ग्रुपच्या अध्यक्षाला पोलिसांचा दणका, अंधेरीमधील खासगी प्लॉट कब्जा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील टायगर ग्रुपच्या अध्यक्षाला पोलिसांचा दणका, अंधेरीमधील खासगी प्लॉट कब्जा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
Mumbai High Court On Tukaram Mundhe FDA: हे योग्य नाही...मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह; नेमकं काय काय म्हटलं?
हे योग्य नाही...मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह; नेमकं काय काय म्हटलं?

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime News: दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
Ramayana Part 1 Trailer Review: प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Embed widget