एक्स्प्लोर

'फडणवीसांनी ती घोषणा केली अन् भाजपची काही मंडळी रडायला लागली, गिरीश महाजनांचं तर रडणं बंद होईना' : अजित पवार 

Ajit Pawar :कोरोनामुक्त होऊन आज विधानसभेत आलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार जोरदार फार्मात दिसले. पहिल्याच दिवशी फुल्ल बॅटिंग करताना अजित पवारांनी अनेक शाब्दिक षटकार लगावले.

Ajit Pawar In Maharashtra Speaker Assembly Session : कोरोनामुक्त होऊन आज विधानसभेत आलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार जोरदार फार्मात दिसले. पहिल्याच दिवशी फुल्ल बॅटिंग करताना अजित पवारांनी अनेक शाब्दिक षटकार लगावले. विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर त्यांचं अभिनंदन करताना अजितदादा बोलत होते. यावेळी त्यांनी नार्वेकरांचं अभिनंदन केलं शिवाय सत्ताधाऱ्यांवर जोरदार टोलेबाजी केली. 

अजित पवार म्हणाले की,  देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा करताच पिनड्रॉप सायलेन्स होता. भाजपची काही मंडळी रडायला लागली. गिरीश महाजनांचं रडणं बंद होईना. फेटा बांधायला दिला तर डोळ्याचं पाणी पुसायला वापरायले. भाजपच्या आमदारांनी सांगावं की खरंच झालं ते कसं झालं. हे जे घडलंय त्यानं समाधान झालंय का हे सांगावं.  चंद्रकांत दादा पाटील तुम्ही बेंच वाजवू नका तुम्हालाच मंत्रीपद मिळत की नाही. सभागृहात धाकधूक आहेत. शिवसेनेतून गेलेले 40 जणांपैकी किती जणांना मंत्रीपद मिळेल माहिती नाही.

मला मूळ भाजपवाल्यांचं वाईट वाटतं

अजित पवार म्हणाले की, मी जेव्हा समोरच्या बाजूला पाहतो तर मूळ भाजपवाले कमी दिसतात. आमच्याकडची लोकं जास्त दिसतात. मला मूळ भाजपवाल्यांचं वाईट वाटतं. पहिली लाईन पाहिली तरी लक्षात येईल. गणेश नाईक, उदय सामंत, बबन पाचपुते, रादाकृष्ण विखे पाटील हे पहिल्या लाईनमध्ये आहेत. आमच्याकडून गेलेले दीपक केसरकर तर आज एकदम भारी प्रवक्ते झाले आहेत, आम्ही शिकवलेलं कुठं वाया गेलं नाही हे दिसतंय, असं अजित पवार यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. 

पवार म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात सांगितलं असतं की अडीच वर्ष झालीत, आता मला तिथं बसायचंय. तरी आम्ही तुम्हाला तिथं बसवलं असतं. काही प्रॉब्लेम झाला नसता. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांना कोट करत नसता आला ना प्रॉब्लेम असं विचारलं. यावरही सभागृहात हशा पिकला. 

नार्वेकर ज्या पक्षात जातात त्या नेतृत्वाला ते आपलंसं करतात

अजित पवार म्हणाले की, नार्वेकर ज्या पक्षात जातात त्या नेतृत्वाला ते आपलंसं करतात.  शिवसेनेत गेल्यावर आदित्य ठाकरे यांना आपलंसं केलं.  आमच्याकडे आल्यावर मला आपलंसं केलं. भाजपमध्ये गेल्यावर देवेंद्र फडणवीस यांना आपलंसं केलं. आता एकनाथ शिंदे तुम्ही यांना आपलंसं करा नाही तर काही खरं नाही, असं अजित पवार म्हणाले. पवार म्हणाले की, नार्वेकर आमचे जावई आहेत. आतापर्यंत आम्ही जावयाचे हट्ट पुरा पुरवायचो. आता त्यांनी आमचा हट्ट पुरवला पाहिजे. जावयांनी सासरचा हट्ट पुरवला पाहिजे, असं ते म्हणाले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
Director Rob Reiner Wife Murder Case: सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Embed widget