एक्स्प्लोर

अभिनेत्री ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करा : कोर्ट

ठाणे क्राईम ब्रांचनं अखेर 23 जून 2017 रोजी ममताला फरार घोषित केलं. याची नोटीस पोलिसांनी ममताच्या यारी रोडवरील घरावर चिटकवली. ममता कुलकर्णीला कोर्टासमोर हजर होण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र ममता कुलकर्णी कोर्टासमोर हजर न राहिल्यानं आज अखेर कोर्टानं संपत्ती जप्तीचे आदेश दिले आहेत.

ठाणे : दोन हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिन तस्करी प्रकरणातील आरोपी अभिनेत्री ममता कुलकर्णीची मालमत्ता जप्त करा, असे आदेश ठाणे न्यायालयानं दिले आहेत. यापूर्वीच न्यायालयाने फरार घोषित केलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या केनियामध्ये वास्तव्यास असल्याची पोलिसांची माहिती आहे. 13 एप्रिल 2016 रोजी ठाणे पोलिसांनी दोन आरोपींकडून तब्बल 12 लाख रुपयांचं इफेड्रिन जप्त केलं होतं. या दोघांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सोलापूर येथील एव्हॉन लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या फॅक्टरीवर छापा टाकून 2 हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिनची देशविदेशात तस्करी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड केला होता. या प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा कथित पती विकी गोस्वामी हादेखील आरोपी आहे. याशिवाय ममताविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून केंद्रीय गुप्तचर खात्याकडे सातत्याने पाठपुरावाही सुरु आहे. ती केनियामध्ये असल्याची पोलिसांची माहिती आहे. रेड कॉर्नर नोटीस बजावल्यानंतर सर्व विमानतळांना संबंधित आरोपीबाबत सतर्क केले जातं. दोन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णीला फरार घोषित करण्यात आलं आहे. यापूर्वीच या प्रकरणात कोर्टानं अटक वॉरंट बजावलं होतं. मात्र त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. ठाणे क्राईम ब्रांचनं अखेर 23 जून 2017 रोजी ममताला फरार घोषित केलं. याची नोटीस पोलिसांनी ममताच्या यारी रोडवरील घरावर चिटकवली. ममता कुलकर्णीला कोर्टासमोर हजर होण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र ममता कुलकर्णी कोर्टासमोर हजर न राहिल्यानं आज अखेर कोर्टानं संपत्ती जप्तीचे आदेश दिले आहेत. दरम्यान दोन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात ममता कुलकर्णीसह विकी गोस्वामीही फरार आहे. काय आहे प्रकरण? एप्रिल आणि मे महिन्यात ठाणे पोलिसांनी 2000 कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामीचं नाव समोर आलं होतं. विकी गोस्वामी सध्या केनियामध्ये आहे. कल्याणमध्ये 12 एप्रिल रोजी पहिल्यांदा एका नायजेरियन ड्रग डिलरला अटक करण्यात आली होती. नायजेरियन डिलरच्या माहितीनुसार, ठाण्यातून  2 तरुणांना अटक करण्यात आली. या दोन्ही तरुणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुण्यातून मयूर स्वामी नावाच्या फॅक्टरी मॅनेजरच्या मुसक्या आवळल्या. या सगळ्यांच्या माहितीनंतर सोलापूरच्या एव्हॉन लाईफ सायन्स ऑरगॅनिक कंपनीवर छापा मारण्यात आला. या कंपनीतून 2000 कोटी रुपये किंमतीचं एफिड्रिन ड्रग्ज सापडलं. या रॅकेटमध्ये आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. अजूनही अनेक आरोपी फरार असून याचा मास्टरमाईंड ममता कुलकर्णीचा पती आणि आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट किंग विकी गोस्वामी आहे. आता ममता कुलकर्णीविरोधातही पोलिसांना महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत.

संबंधित बातम्या :

ममता कुलकर्णी फरार घोषित, मुंबईतील घरावर नोटीस

ड्रग्जप्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णी फरार घोषित

ममता कुलकर्णी ड्रग्ज रॅकेटमध्ये, ठाणे पोलिसांकडून शिक्कामोर्तब !

ABP EXCLUSIVE : मी लग्नही केलं नाही आणि 12 वर्ष शारीरिक संबंधही ठेवले नाही- ममता कुलकर्णी

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
कोणी हस्तक्षेप करुन कुणबी प्रमाणपत्र रद्द केली असतील तर त्यावर यंत्रणा बसवण्याचा विचार, जरांगेंच्या टीकेनंतर उदय सामंतांचं प्रत्युत्तर 
कोणी हस्तक्षेप करुन कुणबी प्रमाणपत्र रद्द केली असतील तर त्यावर यंत्रणा बसवण्याचा विचार, जरांगेंच्या टीकेनंतर उदय सामंतांचं प्रत्युत्तर 
धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू
धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू
Vasai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Embed widget