एक्स्प्लोर
दिघ्यातील ‘मोरेश्वर’नंतर आता ‘पांडुरंग’ इमारतीवरही कारवाई
नवी मुंबई : दिघ्यातील मोरेश्वर इमारत सील करून रहिवाशांना बाहेर काढल्यानंतर आता पांडुरंग इमारत सील करण्यासाठी कारवाई सुरू झाली आहे. मात्र, स्थानिक महिलांनी आक्रमक पवित्रा घेत तीव्र विरोध केला. त्यामुळे पोलिसांनी काही वेळ कारवाई थांबवली.
पांडुरंग इमारतीतून रहिवाशांना खाली उतरण्याचं आवाहन पोलासांकडून करण्यात आले. काही महिलांनी इमारतीचं प्रवेशद्वार अडवून धरला, तर दोन महिलांनी अंगावर रॉकेल ओतलं होतं. महिलांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पोलिसांना काही वेळ कारवाई थांबवावी लागली.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आज दिघ्यातली मोरेश्वर इमारत रिकामी करण्यात आली. या कारवाईला स्थानिक महिलांनी जोरदार विरोध केला. यावेळी काही महिलांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. त्यानंतर आता पांडुरंग इमारतीवरही कारवाई सुरु करण्यात आलीय.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एमआयडीसीकडून 4 फेब्रुवारीला दिघ्यातल्या 7 इमारतींना रिकाम्या करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. यातील 3 इमारती एमआयडीसीच्या जागेवर, तर 4 इमारती सिडकोच्या हद्दीत आहेत.
टप्प्या-टप्प्यानं या सातही इमारती रिकाम्या केल्या जाणार आहेत. त्यात आज मोरेश्वर आणि पांडुरंग या दोन इमारती आज रिकाम्या केल्या जात आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement