एक्स्प्लोर
आधी जोरात धडक देत हवेत उडवले, मग अंगावरून घातली कार...!
मॉर्निंग वॉकला गेलेल्या पती पत्नीला एका कॉल सेंटरच्या कारने जोराची धडक दिली. या अपघातात वाहनचालकाचा क्रूरपणा सीसीटीव्हीतून समोर आला असून जोराची धडक दिल्यानंतर एकजण चाकाखाली आल्यावर तो कार चालक कार चक्क अंगावरून घालून फरार झाला आहे.

वसई : मन हेलावून टाकणारी घटना आज सकाळी वसईत घडली. मॉर्निंग वॉकला गेलेल्या पती पत्नीला एका कॉल सेंटरच्या कारने जोराची धडक दिली. या अपघातात वाहनचालकाचा क्रूरपणा सीसीटीव्हीतून समोर आला असून जोराची धडक दिल्यानंतर एकजण चाकाखाली आल्यावर तो कार चालक कार चक्क अंगावरून घालून फरार झाला आहे. या घटनेत मीर सिकंदर अली आणि त्यांच्या पत्नी सलमा मीर अली हे दोघे पतीपत्नी गंभीर जखमी झाले आहेत. यात मीर सिकंदर अली 5 फूट उंच उडून खाली पडले आणि चाकाखाली आले. यावेळी त्या चालकाने कार चक्क अंगावरून घालून तिथून पळ काढला.
एव्हरशाईन सेक्टर नंबर दोनजवळ अनंत श्रध्दा या इमारतीत राहणारे मीर सिकंदर अली आणि त्यांच्या पत्नी सलमा मीर अली हे दोघे आज सकाळी सहाच्या दरम्यान मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. आपल्या राहत्या सोसायटीपासून काही अंतरावर गेले असताना विरुध्द दिशेने एक स्विफ्ट डिझायर भरधाव वेगाने आली. त्याने या दोघा पतीपत्नीला बेदरकापणे उडवले. यावेळी मीर हे जवळपास पाच फुट उडाले. त्यांच्याच सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही दृश्ये कैद झाले आहे. वाहनचालकाचा क्रुरतेचा कळस म्हणजे जखमी अवस्थेत पडलेल्या मीर यांना उचलण्याचे सोडून त्याने त्यांच्या अंगावरूनच गाडी चढवून पळ काढला. मीर यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्या पत्नी सलमा यांनादेखील गंभीर दुखापत झाली आहे. जवळच्या नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मीर हे कुर्ला येथे आर्किटेक्चर आहेत. त्यांना 12, 6, 3 वर्षांची तीन मुलं आहेत. त्यांच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी केली आहे.
एव्हरशाईन सेक्टर नंबर दोनजवळ अनंत श्रध्दा या इमारतीत राहणारे मीर सिकंदर अली आणि त्यांच्या पत्नी सलमा मीर अली हे दोघे आज सकाळी सहाच्या दरम्यान मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. आपल्या राहत्या सोसायटीपासून काही अंतरावर गेले असताना विरुध्द दिशेने एक स्विफ्ट डिझायर भरधाव वेगाने आली. त्याने या दोघा पतीपत्नीला बेदरकापणे उडवले. यावेळी मीर हे जवळपास पाच फुट उडाले. त्यांच्याच सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही दृश्ये कैद झाले आहे. वाहनचालकाचा क्रुरतेचा कळस म्हणजे जखमी अवस्थेत पडलेल्या मीर यांना उचलण्याचे सोडून त्याने त्यांच्या अंगावरूनच गाडी चढवून पळ काढला. मीर यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्या पत्नी सलमा यांनादेखील गंभीर दुखापत झाली आहे. जवळच्या नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मीर हे कुर्ला येथे आर्किटेक्चर आहेत. त्यांना 12, 6, 3 वर्षांची तीन मुलं आहेत. त्यांच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी केली आहे. आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण























