एक्स्प्लोर
ठाण्यात मद्यपी चालकाची वाहतूक पोलिसाला धडक
ठाणे: पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदेवर झालेल्या हल्ल्याचं प्रकरण ताजं असतानाच ठाण्यात या प्रकाराची पुनरावृत्ती झाली आहे. ठाण्याच्या एलबीएस रोडवर दारुच्या नशेत असलेल्या चालकाने वाहतूक पोलिसाला गाडीवर फरफटत नेलं.
सुदैवानं कॉन्स्टेबल नरसिंग महापुरे यांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर आरोपी योगेश भामरेला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी योगेश भामरे एसबीएस रोडवरुन तीन हात नाक्याकडे राँग साईडने आपली चारचाकी गाडी नेत होता. नरसिंग महापुरे यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने नाशिकच्या दिशेने गाडी वळवली.
यावेळी म्हापुरे त्याच्या गाडीसमोर आल्याने त्याने त्यांनाही जवळपास अर्ध्या किलोमीटर अंतरापर्यंत गाडीसोबत फरफटत नेलं. यावेळी स्थानिकांनी आरोपीला पकडून बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अर्थ बजेटचा 2025
विश्व
भारत
राजकारण
Advertisement