एक्स्प्लोर

हिंदू विवाहाला परदेशातील कोर्ट घटस्फोट देऊ शकत नाही : हायकोर्ट

हिंदू विवाह कायदा, 1955 च्या कलम 19अन्वये या सुनावणीतून वगळता येणार नाही, असे स्पष्ट करत सदर महिलेने दाखल केलेली याचिका हायकोर्टानं मंजूर करून घेतली.

मुंबई : भारतात हिंदू पद्धतीने पार पडलेल्या (हिंदू मॅरेज अॅक्टनुसार) विवाहाला परदेशातील कोर्ट घटस्फोट मंजूर करू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा देत मुंबई उच्च न्यायालयानं मीरारोडमधील एका महिलेला मोठा दिलासा दिला आहे. इंग्लंडमधील कुटुंब न्यायालयाद्वारे पतीनं पाठवलेल्या घटस्फोटाच्या नोटिशी विरोधात या महिलेने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. या याचिकेवर न्यायमूर्ती आर.डी. धनुका यांनी नुकताच हा निर्णय दिला आहे. मुंबईनजीक मीरारोड येथ राहणाऱ्या महिलेचा डिसेंबर 2012 मध्ये इंग्लंडमध्ये स्थायिक असलेल्या पुरूषासोबत भारतीय पद्धतीनं विवाह पार झाला. मीरा भाईंदर महानगरपालिकेत जानेवारी 2013 मध्ये या विवाहाची अधिकृत नोंदणीही करण्यात आली आहे. लग्नानंतर तिचा नवरा इंग्लंडला निघून गेला. जुलै 2013 मध्ये त्याने सदर महिलेलाही इंग्लंडमध्ये बोलावून घेतले. तिथे गेल्यानतंर काही दिवसातच नवऱ्यानं तिला त्रास देण्यास सुरूवात केली आणि भारतात परतण्याचीही जबरदस्ती केली. नवऱ्याच्या जाचाला कंटाळून अखेरीस ही महिला नोव्हेंबर 2013 मध्ये भारतात परतली. त्यानंतर जून 2014 मध्ये महिलेस इंग्लंडमधील कौटुंबिक न्यायालयाकडून घटस्फोटाची कायदेशीर नोटीस मिळाली. नोटीस प्राप्त होताच सदर महिलेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हिंदू मॅरेज अॅक्टनुसार विवाह झाल्यामुळे परदेशातील न्यायालायात घटस्फोट घेता येऊ शकत नाही. आमचा विवाह भारतात झालेला असल्यामुळे घटस्फोटाची प्रक्रिया देखील भारतात होणे बंधनकारक असल्याचे याचिकेतून नमूद करण्यात आलं होतं. मात्र महिलेच्या याचिकेला पतीच्यावतीनं तीव्र विरोध केला गेला. महिलेचा पती हा परदेशी नागरीक असल्याने त्याला हिंदू विवाह कायदा आणि त्यातील तरतुदी लागू होत नाहीत असा युक्तिवाद त्यांनी केला. यावर प्रतिवादी हा जरी परदेशी नागरीक असला तरी त्याचा विवाह हा भारतात हिंदू पद्धतीने झाला आहे. त्यामुळे त्याला हिंदू विवाह कायदा, 1955 च्या कलम 19अन्वये या सुनावणीतून वगळता येणार नाही, असे स्पष्ट करत सदर महिलेने दाखल केलेली याचिका हायकोर्टानं मंजूर करून घेतली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai University : मुंबई विद्यापीठाची विनंती हायकोर्टाकडून मान्य, तांत्रिक अडचणीमुळे सिनेट निवडणूक 24 सप्टेंबरला पार पडणार
मुंबई विद्यापीठाची विनंती हायकोर्टाकडून मान्य, तांत्रिक अडचणीमुळे सिनेट निवडणूक 24 सप्टेंबरला पार पडणार
Numerology : प्रचंड श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट
प्रचंड श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट
Vande Bharat Sleeper पुणेकरांसाठी गुडन्यूज; पहिली वंदे भारत स्लीपर पुणे ते दिल्ली, मंत्रीमहोदयांचे संकेत
पुणेकरांसाठी गुडन्यूज; पहिली वंदे भारत स्लीपर पुणे ते दिल्ली, मंत्रीमहोदयांचे संकेत
Maratha Reservation पुण्यातील मराठा आंदोलक मुंबईत दाखल, पोलिसांचा फौजफाटा; मंत्रालयाला घेराव घालणार
पुण्यातील मराठा आंदोलक मुंबईत दाखल, पोलिसांचा फौजफाटा; मंत्रालयाला घेराव घालणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

रात्री ९ च्या हेडलाईन्स : ABP Majha Marathi News : Headlines 09 PM TOP Headlines : 9 PM 21 September 2024Sachin Khilari Majha Katta : हात गमावला पण धैर्य कमावलं! रौप्यपदक विजेता सचिन खिलारी 'माझा कट्टा'वरPrataprao Jadhav On Electricity : 'माझ्या आजोबांनी, वडिलांनी आणि मी कधीच वीज बिल भरलं नाही'- जाधवPrakash Ambedkar On Vidhansabha Seats : प्रकाश आंबेडकरांकडून विधानसभेसाठी ११ उमेदवार जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai University : मुंबई विद्यापीठाची विनंती हायकोर्टाकडून मान्य, तांत्रिक अडचणीमुळे सिनेट निवडणूक 24 सप्टेंबरला पार पडणार
मुंबई विद्यापीठाची विनंती हायकोर्टाकडून मान्य, तांत्रिक अडचणीमुळे सिनेट निवडणूक 24 सप्टेंबरला पार पडणार
Numerology : प्रचंड श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट
प्रचंड श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट
Vande Bharat Sleeper पुणेकरांसाठी गुडन्यूज; पहिली वंदे भारत स्लीपर पुणे ते दिल्ली, मंत्रीमहोदयांचे संकेत
पुणेकरांसाठी गुडन्यूज; पहिली वंदे भारत स्लीपर पुणे ते दिल्ली, मंत्रीमहोदयांचे संकेत
Maratha Reservation पुण्यातील मराठा आंदोलक मुंबईत दाखल, पोलिसांचा फौजफाटा; मंत्रालयाला घेराव घालणार
पुण्यातील मराठा आंदोलक मुंबईत दाखल, पोलिसांचा फौजफाटा; मंत्रालयाला घेराव घालणार
Sharad Pawar विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
जमिनीवर बांधता येईना अन् समुद्रात महाराजांचा पुतळा बांधायला निघाले; राज ठाकरेंनी सांगितला खर्च
जमिनीवर बांधता येईना अन् समुद्रात महाराजांचा पुतळा बांधायला निघाले; राज ठाकरेंनी सांगितला खर्च
Success Story: सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरपंचांचे कान टोचले
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरपंचांचे कान टोचले
Embed widget