ABP Ideas of India: 'द कश्मीर फाइल्स''वरून बॉलीवूडमध्ये दोन गट पडेल आहे का? नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला...
Nawazuddin Siddiqui: अभिनेता नवाझुद्दिन सिद्दिकी आज आपल्या देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. असं असलं तरी अजूनही त्याचे पाय जमिनीवर आहेत.
Nawazuddin Siddiqui: अभिनेता नवाझुद्दिन सिद्दिकी आज आपल्या देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. असं असलं तरी अजूनही त्याचे पाय जमिनीवर आहेत. आज एबीपी आयडियाज ऑफ इंडियाच्या (ABP Ideas of India Summit 2022) या कार्यक्रमाला वेळेत उपस्थित राहण्यासाठी नवाझुद्दिन याने चक्क रेल्वेने प्रवास करत कार्यक्रमात उपस्थित झाला. नवाझुद्दिन मीरारोड येथे आपल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. मुंबईतील सांताक्रूझ येथे सुरु असलेल्या या कार्यक्रमाला वेळेत पोहोचण्यासाठी त्याने रेल्वेने प्रवास केला, त्यानंतर एका बाईक चालकाकडे लिफ्ट मागत या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. याबाबत कार्यक्रमात उपस्थित लोकांना कळल्यानंतर सर्वानी उभे राहून टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं.
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाईल्स' हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. विवेकच्या या चित्रपटावरून बॉलिवूडपासून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दोन गट पडले आहेत. एक वर्ग या चित्रपटावर टीका करतोय, तर दुसरा गट कौतुक. एकीकडे बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी या चित्रपटाबाबत मौन बाळगले असताना दुसरीकडे इंडस्ट्रीशी संबंधित असे स्टार्सही आहेत जे या चित्रपटाचे कौतुक करताना थकत नाहीत. एकूणच या चित्रपटाबद्दल अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यावरच बोलताना अभिनेता नवाझुद्दिन सिद्दिकी म्हणाला आहे की, ''मी हा चित्रपट अद्याप पाहिला नाही, मात्र पाहणार हे नक्की.''
या चित्रपटावरून बॉलीवूडमध्ये फूट पडली आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना नवाज म्हणाला, ''मला हे माहीत नाही, पण प्रत्येक दिग्दर्शकाचा प्रत्येक चित्रपट बनवण्याचा आपला दृष्टिकोन असतो. त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून चित्रपट बनवला, यापुढेही दिग्दर्शक त्यांच्या दृष्टिकोनातून चित्रपट बनवणार आहे. मी हा चित्रपट पाहिला नाही, मात्र चित्रपटांमध्ये काही गोष्टी जोडल्या देखील जातात. पण दिग्दर्शक जेव्हा असे चित्रपट बनवतील, तेव्हा साहजिकच ते फॅक्ट तपासूनच बनवतील.'' राजकारण्यांकडून चित्रपटाची होत असलेल्या स्तुतीबद्दल तो म्हणाला, त्यांना हा चित्रपट आवडला असेल, म्हणून ते त्याचे कौतुक करत असावे.
मी अभिनेता नसतो तर साधू झालो असतो, नवाझुद्दिन सिद्दिकीने केला अनेक गोष्टींचा खुलासा
यावेळी बोलताना नवाझुद्दिन सिद्दिकी म्हणाला आहे की, ''मी अभिनेता झालो नसतो तर साधू झालो असतो. मी दोन ते तीन वेळा धर्मशाळेत जाऊन साधू बनण्याचा प्रयत्न देखील केला.''
इतर महत्वाच्या बातम्या:
- ABP Ideas of India: माझं कोणतंही बॉलीवूड ड्रीम नव्हतं, एबीपीच्या मंचावर 'पपॉन'ने केलं मनमोकळं
- ABP Ideas of India: आता बॉलीवूड, टॉलीवूड हे शब्द वापरण्याऐवजी 'इंडियन फिल्म इंडस्ट्री' म्हणावं: करण जोहर
- ABP Ideas of India: माझं नाव खान असल्याने मला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला जातो - कबीर खान
- ABP Ideas of India: 'गुजरातने चार लोक दिली, दोन विक्रेते आणि दोन खरेदीदार': भूपेश बघेल
- ABP Ideas of India: पश्चिम बंगालचा राज्यपाल म्हणून मी गेली अडीच वर्षे त्रास सहन करत आहे : जगदीप धनखर
- ABP Ideas of India : भारताचा राष्ट्रवाद धर्मावर नव्हे तर संविधानावर आधारित : शशी थरूर