(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Ideas of India: माझं नाव खान असल्याने मला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला जातो - कबीर खान
Kabir Khan: बॉलीवूडचे तीन मोठे दिग्दर्शक कबीर खान, आनंद एल राय आणि नागेश कुकुनूर यांनी आज एबीपी आयडियाज ऑफ इंडिया (ABP Ideas of India Summit 2022) कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी हजेरी लावली.
Kabir Khan: बॉलीवूडचे तीन मोठे दिग्दर्शक कबीर खान, आनंद एल राय आणि नागेश कुकुनूर यांनी आज एबीपी आयडियाज ऑफ इंडिया (ABP Ideas of India Summit 2022) कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी हजेरी लावली. यावेळी या तिन्ही दिग्दर्शकांनी चित्रपटांमधील वाद आणि सोशल मीडियावरील चर्चेवर आपले मत मांडले आहे.
सोशल मीडियावर अधिक नकारात्मकता
या कार्यक्रमात बोलताना आपल्या राष्ट्रवाद आणि देशभक्तीबद्दल कबीर खान म्हणाले की, ''मी जे काही चित्रपट करतो, त्यात माझ्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब असतं. आजकाल राष्ट्रवाद आणि देशभक्ती यात फरक आहे. राष्ट्रवादासाठी तुम्हाला खलनायकाची गरज असते. मात्र देशभक्तीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रतिवादाची गरज नसते. यावेळीही मी तसाच प्रयत्न केला. माझे काही असे चित्रपट आहेत, ज्यात मी अनेक तिरंगे दाखवले, पण ते चित्रपट चालले नाहीत.''
राष्ट्रवादाबद्दल चुकीच्या भाषेच्या वापरावर कबीर खान म्हणाले की, ''सोशल मीडियामुळे लोकांना खूप स्वातंत्र्य मिळाले आहे. काही वर्षांआधी ते असं करू शकत नव्हते. हे सर्व पाहून वाईट वाटतं. सोशल मीडियाची नकारात्मकता त्याच्या सकारात्मकतेवर भारी पडत आहे. मात्र मी याशी लढायला निघालो आहे. गोष्टी सांगायला निघालो आहे.'' ते म्हणाले, माझे नाव खान असल्याने मला अनेक लोक 'गो टू पाकिस्तान' म्हणतात. मी एकदा पाकिस्तानात गेलो होतो. मात्र तेथील लष्कराने मला गो टू इंडिया म्हटले. मी ना इथला राहिलो ना तिथला.''
आता वेगळ्या प्रकारची गोष्ट सांगणं सोप्प झालं आहे : आनंद एल राय
चित्रपट दिग्दर्शक आनंद एल राय यांनी सध्याच्या काळातील चित्रपटांबद्दल बोलताना सांगितलं की, ''जेव्हा एखादी कथा निवडली जाते, तेव्हा समाजासोबत येणारी पिढी मला खूप बळ देते. माझ्या कथांसाठी मला यांच्याकडे पाहूनच ताकद मिळते. आजपासून 10 ते 15 वर्षांपूर्वी मी त्या कथा सांगू शकत नव्हतो, ज्या मला सांगायच्या होत्या. मात्र आता माझ्याकडे असे प्रेक्षक आहेत, ज्यांना मी माझी कथा सांगू शकतो.''
अॅक्टर्सच्या डेटची वाट पाहू शकता नाही : नागेश कुकुनूर
नागेश कुकुनूर यांनी चित्रपटातील कास्टिंगबद्दल सांगितले की, ''माझा दृष्टिकोन नेहमीच वेगळा राहिला आहे. मी कलाकारांसाठी जास्त वेळ थांबू शकत नाही. वर्षभरानंतर मला कोणी डेट दिली, तर मी लगेच दुसरा अभिनेता शोधू लागतो. मी नवीन कलाकार निवडतो. कारण मी त्यांना माझ्या पद्धतीने तयार करू शकतो आणि मी कोणत्याही अभिनेत्याच्या डेटसाठी जास्त वेळ थांबू शकत नाही. हीच माझ्या काम करण्याची पद्धत आहे.''
इतर महत्वाच्या बातम्या:
ABP Ideas of India: 'गुजरातने चार लोक दिली, दोन विक्रेते आणि दोन खरेदीदार': भूपेश बघेल
ABP Ideas of India: पश्चिम बंगालचा राज्यपाल म्हणून मी गेली अडीच वर्षे त्रास सहन करत आहे : जगदीप धनखर
ABP Ideas of India : भारताचा राष्ट्रवाद धर्मावर नव्हे तर संविधानावर आधारित : शशी थरूर