एक्स्प्लोर

Aaditya Thackeray : मुंबईसह राज्यात हवेची गुणवत्ता खालावली; आदित्य ठाकरेंकडून केंद्र सरकारला हस्तक्षेप करण्याची मागणी

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मेट्रो 3 कारशेडसाठी मुंबईकरांच्या इच्छेविरुद्ध आणि सूड म्हणून आरे जंगलासाठी तडजोड केल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Aaditya Thackerayशिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केंद्रीय मंत्री भूपेंदर यादव यांना पत्र लिहून मुंबईत ढासळलेला हवेचा दर्जा आणि महाराष्ट्रातील वाढत्या वायू प्रदूषणाच्या (air pollution) मुद्द्यावरून चिंता व्यक्त केली आहे. तसेच राज्याला पूर्णवेळ पर्यावरण मंत्री नाही, याकडे लक्ष वेधले आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या सहा महिन्यांत मुंबईतील हवेच्या गुणवत्तेला AQI वर सातत्याने ‘खराब’ आणि ‘खूप खराब’ असे रेट केले गेले आहे. महाराष्ट्रातील इतर शहरे देखील हवेच्या गुणवत्तेबद्दल पोस्ट करत आहेत आणि त्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

काय म्हटले आहे ट्वीटमध्ये?

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार हिरवळ असलेल्या जमिनींवरून कमाई करत आहे आणि मुंबई मेट्रो 3 कारशेडसाठी मुंबईकरांच्या इच्छेविरुद्ध आणि सूड म्हणून आरे जंगलासाठी तडजोड केल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, “मी केंद्रीय मंत्री भूपिंदर यादव यांना महाराष्ट्राच्या हवेच्या प्रदूषण संकटाबद्दल पत्र पाठवलं आहे. तसेच मुंबईच्या AQI वर लक्ष केंद्रित केले आहे. पूर्णवेळ पर्यावरण मंत्र्याची अनुपस्थिती आणि राज्याच्या बेकायदेशीर सरकारमधील सार्वजनिक समस्यांबद्दल संवेदनशीलतेचा अभाव यामुळे हे संकट अधिकच बिकट झाले आहे, कारण कोणतीही कारवाई होत नाही. बीएमसीची स्टडी कमिटी आणि स्मॉग टॉवर्स केवळ त्यांच्या कंत्राटदारांच्या फायद्यासाठी युक्ती आहे. मला आशा आहे की, या पत्राला प्रतिसाद देऊन हस्तक्षेप कराल.” 

स्वतंत्र कार्यभार असलेला पर्यावरण मंत्री नाही

त्यांच्या पत्रात पुढे म्हटले आहे की, “महाराष्ट्रात, विशेषतः शहरातील हवेच्या गुणवत्तेची बिघडलेली गंभीर परिस्थिती तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी मी लिहित आहे. ही समस्या नागरिकांच्या जीवनावर दैनंदिन परिणाम करत आहे. आव्हानांना तोंड देण्यासाठी धोरणात्मक पातळीवर फारशी प्रगती होत नाही. परिणामी, शहरांमध्ये ताजी हवा आणि ऑक्सिजनची कमतरता आहेत. महाराष्ट्र राज्याला सध्या स्वतंत्र कार्यभार असलेला पर्यावरण मंत्री नाही. हा मुद्दा तुमच्यामार्फत केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही.” प्रदूषणाची कारणे सांगताना या पत्रात माहुल किंवा वडाळा यांसारख्या पूर्व मुंबईतील ठिकाणी बांधकाम प्रकल्प, रिफायनरी आणि खतनिर्मिती संयंत्रे प्रदूषणाची प्रमुख कारणे आहेत आणि हे प्लान्ट शहरापासून दूर स्थलांतरित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

‘पोल्युटर पे’ तत्त्व लागू केले पाहिजे

“मुंबईतील बांधकाम प्रकल्प मोठ्या प्रमाणावर आहेत आणि प्रभावी पर्यवेक्षणाचा अभाव आहे. संपूर्ण शहरात बांधकाम सुरू आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ आणि ढिगारा पडले आहेत. ज्यापैकी बरेच दुर्लक्षित आणि न पाहिलेले आहेत. शहराच्या पर्यावरणावर बांधकामाचा एकत्रित परिणाम समजून घेण्यासाठी नगरविकास विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना मदत करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. या प्रभावाचे मूल्यांकन केल्यानंतर, ‘पोल्युटर पे’ तत्त्व लागू केले पाहिजे. शहराच्या पूर्व किनार्‍यावर रिफायनरीज आणि खत निर्मितीचे कारखाने आहेत आणि तेथे चोवीस तास औद्योगिक कामांचा थेट परिणाम शहरातील हवेच्या गुणवत्तेवर होत आहे. माहुल किंवा वडाळा सारख्या ठिकाणच्या परिसरातील रहिवाशांना खराब हवेची गुणवत्ता आणि दुर्गंधी यांचा परिणाम जाणवत आहे. भारत सरकारने या प्लान्टचे मूल्यांकन करून शहरापासून दूर स्थलांतरित करावे,” असे पत्रात म्हटले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget