Aaditya Thackeray SIT news Live: दिशा सालिअन प्रकरणात सगळं सुडाचं राजकारण, चौकशीत काहीच मिळणार नाही : सुनिल प्रभू
Aaditya Thackeray Disha Salian case Live : आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिशा सॅलियनप्रकरणी एसआयटी चौकशी करणार असून अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात एसआयटी पथक काम करणार आहे.
LIVE

Background
Bharat Gogawale on Disha Salian case: दूध का दूध पाणी का पाणी होईल : भरत गोगावले
जर चूक असेल तर दूध का दूध पाणी का पाणी होईल. चुकी नसेल तर घाबरण्याचं काम नाही, असं म्हणते शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी आदित्य ठाकरेंच्या एसआयटी चौकशीवर भाष्य केलं. सुनील प्रभू आता अवसान आणल्या सारखे बोलतोय. विरोधकांकडे राहिले काय आहे त्यांनी आता जय महाराष्ट्र करावा..तीन राज्यात काय झालं आपण पाहिले आहे, असं भरत गोगावले म्हणाले.
Sunil Prabhu On Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंची SIT चौकशी ही राजकीय सुडापोटी : सुनील प्रभू
Sunil Prabhu On Aaditya Thackeray: Disha Salian प्रकरणी आदित्य ठाकरेंची SIT चौकशी ही राजकीय सुडापोटी केली आहे. माझे सरकारला आवाहन आहे की, ललित पाटील प्रकरणातील अडकलेलया मंत्र्याची चौकशी करा. चौकशीतून काही मिळणार नाही, असे ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू म्हणाले.
Disha Salian suicide case: एसआयटीसंदर्भात सुजाता सौनिक आज ऑर्डर काढण्याची शक्यता
Disha Salian suicide case: आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. SIT चौकशीत अनेक पुरावे समोर येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. एसआयटीसंदर्भात सुजाता सौनिक आज ऑर्डर काढू शकतात.
Prithviraj Chavan : सरकार सूडबुद्धीने काम करत आहे : पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan On Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे यांच्या संदर्भातली एसआयटी चौकशी म्हणजे सरकार सूडबुद्धीने काम करत आहे का? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
VinayaK Raut: शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून मातोश्रीच्या मागे लागले : विनायक राऊत
VinayaK Raut On Aaditya Thackeray SIT: कोणती चौकशी पुन्हा करावी हा त्यांचा हेतू आहे. दुष्ट हेतुतून हे सरकार काम करत आहे. शेतकरी रडत आहे तिकडे बघायला यांना वेळ नाही मात्र मातोश्रीच्या मागे हे लागले आहेत. या सरकारला ठेवल्याशिवाय राज्यातील जनता स्वस्थ बसणार नाही
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
