एक्स्प्लोर

आदित्य ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना खास शुभेच्छा; भन्नाट फोटो शेअर व्यक्त केल्या भावना

उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. एक खास फोटो सोशल मीडियावर टाकत आदित्य यांनी आपल्या वडिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

Birthday Wishes To Uddhav Thackeray : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज 62 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. सर्वपक्षीय नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. अशात उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. एक खास फोटो सोशल मीडियावर टाकत आदित्य यांनी आपल्या वडिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

फोटो शेअर करत आदित्य यांनी म्हटलं आहे की, माझ्या वडिलांना आणि माझ्या नेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जे मला दररोज प्रामाणिकपणे आणि दयाळूपणे मी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी प्रोत्साहन देतात. माझ्याकडून गोष्टी अधिकाधिक चांगल्या होण्यासाठी प्रेरित करतात, असं आदित्य यांनी म्हटलं आहे. 

उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर गर्दी

उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिकांनी आज मातोश्री निवासस्थानाबाहेर गर्दी केली आहे. शिवसैनिकांच्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे हे सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत. पण फक्त शुभेच्छा द्या, हारतुरे नको, पुष्पगुच्छ आणि फोटोफ्रेम्स नको, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे. त्यांच्या आवाहनानंतर शुभेच्छा द्यायला मोठी रीघ मातोश्रीवर लागली आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकानं रक्तानं रेखाटलं पोर्ट्रेट

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एका शिवसैनिकानं रक्तानं पोर्ट्रेट रेखाटून शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिकांनी आज मातोश्री निवासस्थानाबाहेर गर्दी केली आहे. त्यात एका शिवसैनिकानं आणलेलं पोर्ट्रेट सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होतं. या शिवसैनिकानं उद्धव ठाकरे यांचं पोर्ट्रेट रक्तानं रेखाटून त्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपण उद्धव ठाकरेंबरोबर आहोत हे सांगण्यासाठी असं चित्र रेखाटल्याचं त्यांनी सांगितलं.

बंडखोर आमदार, खासदारांच्या जाहिराती  'सामना'नं नाकारल्या 

शिवसेनेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सामनात बंडखोर आमदार खासदारांनी जाहिराती दिल्या खऱ्या, पण सामनानं या जाहिराती नाकारल्या.शिंदे समर्थक खासदार राहुल शेवाळे यांनी ही माहिती दिलीय. बंडखोरांकडून शुभेच्छांच्या जाहिराती सामनातून नको अशी भूमिका शिवसेनेनं घेतल्याचा त्यांचा दावा आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : 'शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल, विधानसभा निवडणुका होऊ द्या; मग दाखवतोच!'; उद्धव ठाकरेंचा मुलाखतीच्या दुसऱ्या भागातही हल्लाबोल

Uddhav Thackeray Interview : 'यांची भूकच भागत नाही, आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय', उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर प्रहार

Uddhav Thackeray Interview : क्रॅम्प आला अन् मानेखालची हालचालच थांबली; उद्धव ठाकरे यांनी सांगितला 'तो' अनुभव 

महत्त्वाच्या बातम्या

Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget