एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : 'शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल, विधानसभा निवडणुका होऊ द्या; मग दाखवतोच!'; उद्धव ठाकरेंचा मुलाखतीच्या दुसऱ्या भागातही हल्लाबोल

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतलेल्या मुलाखती दुसरा भाग आज प्रसारीत झाला आहे. या भागात बंडखोरांसह केंद्र सरकार, भाजपवर ठाकरेंनी थेट निशाणा साधला आहे.

Uddhav Thackeray Interview by Sanjay Raut : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारीत झाला आहे. या भागात बंडखोरांसह केंद्र सरकार, भाजपवर ठाकरेंनी थेट निशाणा साधला आहे. तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल, विधानसभा निवडणुका होऊ द्या; मग दाखवतोच! अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी इशारा दिला आहे. 

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांच्या अभूतपूर्व बंडाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) अल्पमतात आलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि सरकार कोसळलं. यानंतर एकनाथ शिंदे गटाने भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केलं. या सर्व घडमोडीनंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच 'सामना'चे (Saamna) कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मुलाखत दिली. या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारित झाला.  

उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, मुंबई महापालिकेविषयी शंका निर्माण करण्यात येत आहे आणि शिवसेनेचा पराभव करू अशा वल्गना सुरू आहेत.  याच्या पूर्वी अनेकांनी म्हटलंय की, 'शिवसेना' या निवडणुकीनंतर राहणार नाही वगैरे! मुंबईत आता मुंबईकर म्हणून सगळे एकत्र आलेत. त्यावेळी त्यांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला की, हे मराठी ते अमराठी वगैरे, पण आता ही सगळी मंडळी मला येऊन भेटताहेत. मराठी, अमराठी अशी फूट पाडण्याचा प्रयत्न आजसुद्धा सुरू आहे. पण आता याला कोणी बळी पडणार नाही. मराठी माणसं एकवटली आहेत. तमाम मुंबईकर आज निवडणुकांची वाट बघतोय आणि माझं मत असं आहे की, मुंबईच्याच नव्हे, तर राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकाही व्हायला हव्यात.

शिवसेनेचा मुख्यमंत्री परत होईल? 

शिवसेनेचा मुख्यमंत्री परत होईल? असा सवाल ठाकरे यांना संजय राऊतांनी विचारला असता ते म्हणाले की, का नाही होणार? आणि तो जर करायचा नसेल तर माझ्या लढाईला काय अर्थ आहे. माझं जे शिवसेनाप्रमुखांना वचन आहे ते आजही कायम आहे. मी तर शिवसेनेचाच आहे. मी पक्षप्रमुख आहे. पण माझा हेतू तो नव्हता. मी मुख्यमंत्री होणार असे मी बोललो नव्हतो आणि वचन पूर्ण केल्यानंतरसुद्धा मी काय दुकान बंद करून बसेन? शिवसेना मला वाढवायची आहे आणि ती जर का वाढवण्याचा प्रयत्न मी सोडणार असेन तर मी कशाला पक्षप्रमुख? असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, ज्यांना मी आपले मानले , तीच माणसं सोडून गेली . म्हणजेच ती माणसं कधीच आपली नव्हती . त्यांच्याबद्दल वाईट वाटण्याचे कारण नाही.भाजपात आज बाहेरून आलेल्यांनाच सर्वकाही दिलं जातंय. महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला नाही . लोकांनी स्वागतच केले . ' वर्षा ' सोडून जाताना महाराष्ट्रात अनेकांनी अश्रू ढाळले . कोणत्या मुख्यमंत्र्यांना असे प्रेम मिळाले ? त्या अश्रूंचे मोल मी वाया जाऊ देणार नाही !'' असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

दिल्लीवाल्यांना शिवसेना विरुद्ध शिवसेना असा झगडा लावायचाय

उद्धव ठाकरे यांनी देशातील लोकशाहीचे भवितव्य , विरोधी पक्षांना खतम करण्यासाठी सुरू असलेला ' ईडी ', ' सीबीआय ' चा गैरवापर यावरही भाष्य केलं आहे.  दिल्लीवाल्यांना शिवसेना विरुद्ध शिवसेना असा झगडा लावून महाराष्ट्रात मराठी माणसांकडून मराठी माणसांचीच डोकी फोडायची आहेत !'' विरोधी पक्षाची भीती सत्ताधाऱ्यांना वाटायला लागली असेल तर तो त्यांचा कमकुवतपणाच म्हणावा लागेल. लोकशाहीचा अर्थ असा नाही की, प्रत्येक वेळी विजय मिळेल. शिवसेना, काँग्रेस, भाजप कुठलाही पक्ष असो, त्यांना सातत्याने विजय प्राप्त होत नसतात. जय-पराजय सगळ्य़ांचेच होत असतात. नवीन पक्ष उदयाला येत असतात. तेही काही काळ चमकून जातात. हीच तर लोकशाहीची वेगळी गंमत आहे. आपल्या देशात सध्या लोकशाही संपून हुकूमशाही आली असे मी म्हणणार नाही . पण ज्या दिशेने पावलं पडताहेत ती पाहता अनेक जणांचं मत आहे की , ही पावलं , ही लक्षणं काही बरी नाहीयत . चुकीच्या दिशेने पडताहेत , असेच अनेकांचे मत आहे .
  
प्रादेशिक पक्ष संपविण्याचे कारस्थान जोरात सुरू 

देशातले विरोधी पक्ष , प्रादेशिक पक्ष संपविण्याचे कारस्थान जोरात सुरू आहे.   देशातील आताची परिस्थिती अगदी तशीच आहे. मात्र विरोधी पक्षाची भीती सत्ताधाऱ्यांना वाटायला लागली असेल तर तो त्यांचा कमकुवतपणाच म्हणावा लागेल. लोकशाहीचा अर्थ असा नाही की, प्रत्येक वेळी विजय मिळेल. शिवसेना, काँग्रेस, भाजप कुठलाही पक्ष असो, त्यांना सातत्याने विजय प्राप्त होत नसतात. जय-पराजय सगळय़ांचेच होत असतात. नवीन पक्ष उदयाला येत असतात. तेही काही काळ चमकून जातात. हीच तर लोकशाहीची वेगळी गंमत आहे. पण सर्वकाही तुमच्या बुडाखाली ठेवायचे अशी राक्षसी महत्त्वाकांक्षा येते, तेव्हा मात्र त्यांना विरोधी पक्षाची भीती वाटायला लागते. मीही मुख्यमंत्री होतो. आज नाहीय, पण तुमच्यासमोर पहिल्यासारखा बसलोय. काय, फरक काय पडला? सत्ता येते आणि जाते. मग सत्ता परत येते. माझ्यासाठी म्हणाल तर, सत्ता असली काय आणि नसली काय, काहीच फरक पडत नाही. अटलबिहारी वाजपेयीजी एकदा बोलले होते, 'सत्ता आती है, जाती है. लेकीन देश रहना चाहिये.' देश राहण्यासाठी सगळ्या पक्षांनी मिळून काम नाही केले तर आपणच आपल्या देशाचे शत्रू आहोत. कारण देशाला आजसुद्धा अनेक प्रश्न भेडसावताहेत. सध्या रुपयाने नीचांक आणि महागाईने उच्चांक गाठलाय. बेरोजगारी आहे. अशा सगळ्या गोष्टींकडे कुणाचे लक्ष नाही. थातूरमातूर मलमपट्टी केली जाते, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray Interview : 'यांची भूकच भागत नाही, आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय', उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर प्रहार

Uddhav Thackeray Interview : क्रॅम्प आला अन् मानेखालची हालचालच थांबली; उद्धव ठाकरे यांनी सांगितला 'तो' अनुभव

Uddhav Thackeray Interview : माझ्या शरीराची हालचाल होत नव्हती तेव्हा सत्तांतरासाठी हालचाली सुरु होत्या : उद्धव ठाकरे
   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Professor Dancing Viral Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Devendra Fadnavis : तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !  जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !
Nagpur News : बॉलीवूडच्या 'त्या' अभिनेत्यांवर कारवाई होणार, मोठ्या संकटात सापडणार? फडणवीसांच्या जवळच्या आमदाराचं वक्तव्य
बॉलीवूडच्या 'त्या' अभिनेत्यांवर कारवाई होणार, मोठ्या संकटात सापडणार? फडणवीसांच्या जवळच्या आमदाराचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 02 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsABP Majha Headlines : 01 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsRaj Thackeray on MNS | पक्ष बांधणीसाठी मनसेची नवी यंत्रणा, अमित ठाकरेंकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारीJaykumar Gore on Black Magic | कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाईट होणार नाही-जयकुमार गोरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Professor Dancing Viral Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Devendra Fadnavis : तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !  जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !
Nagpur News : बॉलीवूडच्या 'त्या' अभिनेत्यांवर कारवाई होणार, मोठ्या संकटात सापडणार? फडणवीसांच्या जवळच्या आमदाराचं वक्तव्य
बॉलीवूडच्या 'त्या' अभिनेत्यांवर कारवाई होणार, मोठ्या संकटात सापडणार? फडणवीसांच्या जवळच्या आमदाराचं वक्तव्य
इकडं भाजपच्या संकटमोचकांचा मीडियाशी संवाद, तिकडं खुद्द मुख्यमंत्री ताटकळत राहिले उभे, माहिती मिळताच गिरीशभाऊ अक्षरशः धावत निघाले, VIDEO
इकडं भाजपच्या संकटमोचकांचा मीडियाशी संवाद, तिकडं खुद्द मुख्यमंत्री ताटकळत राहिले उभे, माहिती मिळताच गिरीशभाऊ अक्षरशः धावत निघाले, VIDEO
Video : न्यायमूर्तींच्या बंगल्यातील स्टोअर रुममध्ये पाचशेच्या नोटांच्या पोत्यांची थप्पी जळत असताना 65 सेकंदाचा अनकट Video; अग्नीशमन कर्मचारी म्हणाला, महात्मा गांधींमध्ये आग लागली!
Video : न्यायमूर्तींच्या बंगल्यातील स्टोअर रुममध्ये पाचशेच्या नोटांच्या पोत्यांची थप्पी जळत असताना 65 सेकंदाचा अनकट Video; अग्नीशमन कर्मचारी म्हणाला, महात्मा गांधींमध्ये आग लागली!
Sunita Williams : डोनाल्ड ट्रम्प स्वत:च्या खिशातून सुनीता विल्यम्स यांना ओव्हरटाईमचा पगार देणार; त्यांचा एकूण पगार किती अन् कोणत्या सुविधा मिळतात?
डोनाल्ड ट्रम्प स्वत:च्या खिशातून सुनीता विल्यम्स यांना ओव्हरटाईमचा पगार देणार; त्यांचा एकूण पगार किती अन् कोणत्या सुविधा मिळतात?
Devendra Fadnavis : नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा मेगाप्लॅन, योगी आदित्यनाथांची 'ती' गोष्ट हेरली, महत्त्वाचा निर्णय घेतला
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा मेगाप्लॅन, योगी आदित्यनाथांची 'ती' गोष्ट हेरली, महत्त्वाचा निर्णय घेतला
Embed widget