एक्स्प्लोर
Advertisement
मुलुंडमध्ये तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारली
रिक्षाचालक अश्लील हावभाव केल्याने आणि चुकीच्या दिशेने रिक्षा नेल्याने मुलुंडमधील एका तरुणी धावत्या रिक्षातून उडी मारली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई : एका 20 वर्षीय तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारल्याची घटना मुलुंडमध्ये घडली आहे. रिक्षाचालकाने अश्लील हावभाव करुन पाहिल्याने आणि चुकीच्या दिशेने रिक्षा नेण्याचा प्रयत्न करताच प्रसंगावधान दाखवत रिक्षातून उडी मारली. गुरुवारी (14 फेब्रुवारी) रात्री ही घटना घडली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
ही 20 वर्षीय तरुणी मुलुंडच्या संभाजीनगर विभागात राहते. गुरुवारी रात्री ती मुलुंड कॉलनी परिसरात राहत असलेल्या तिच्या भावाकडे कामानिमित्त गेली होती. रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान ती रिक्षाने तिच्या घराकडे येत होती. परंतु ती ज्या रिक्षाने प्रवास करत होती त्या रिक्षाचा चालक आरशातून वारंवार तिच्याकडे अश्लील नजरेने पाहत होता. त्यातच तरुणीने मुलुंडच्या पंचरत्न मंदिराकडे रिक्षा नेण्यास सांगितली असता, त्याने रिक्षा दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर गतिरोधक आल्यावर रिक्षाचा वेग कमी झाला आणि त्यावेळी प्रसंगावधान दाखवत तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारली. या सगळ्या प्रकारात तरुणीच्या डोक्याला दुखापतही झाली. ही घटना पाहत असलेल्या काही स्थानिकांनी तिला महापालिकेच्या अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तिथे उपचार घेतल्यानंतर तरुणीने मुलुंड पोलीस ठाण्यात अक्षात रिक्षाचालकाविरोधात तक्रार नोंदवली . पोलिसांनी कलम 509 अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे असून चालकाचा शोध सुरु आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement