एक्स्प्लोर
Advertisement
लॅम्बॉर्गिनी फेम आमदार नरेंद्र मेहतांच्या कंपनीला 79 कोटीचा दंड
मुंबई: भाजपचे लॅम्बॉर्गिनी फेम आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनीला महसूल खात्यानं 79 कोटीचा दंड ठोठावला आहे.
घोडबंदर रोडवर मेहता यांच्या कंपनीनं एका रहिवाशी इमारतीचं बांधकाम सुरु केलं आहे. मात्र ज्या जमिनीवर ही इमारत उभी राहणार आहे तिथं आधी भलामोठा खड्डा होता. तो खड्डा भरण्यासाठी खनिजयुक्त मातीचा वापर करण्यात आला. जो कायद्याच्या विरोधात आहे.
त्यामुळे या कंपनीला 79 कोटी 42 लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. नरेंद्र मेहता अर्थसंकल्पीय अधिवेशनात 3 कोटीच्या आलिशान लॅम्बॉर्गिनी गाडीनं आले होते. ज्याची भलतीच चर्चा विधीमंडळात होती. दरम्यान, याप्रकरणी मेहता यांनी आपण उद्या प्रतिक्रिया देऊ असं म्हटलं आहे.
नरेंद्र मेहता हे मीरा भाईंदरचे आमदार आहेत. निवडणूक जाहीरनाम्यात त्यांची संपत्ती ही 18 कोटींच्या घरात आहे.
नरेंद्र मेहता हे सेव्हन इलेव्हन ग्रुप ऑफ कंपनीचे मालक आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या पत्नीच्या वाढदिवसाला ही आलिशान लॅम्बॉर्गिनी गिफ्ट दिली होती. पहिल्याच दिवशी त्यांच्या पत्नीने याच गाडीने रिक्षाला धडक दिली होती. त्यामुळे याच कारमुळे नरेंद्र
मेहता चर्चेत आले होते.
लॅम्बॉर्गिनीमध्ये भारतात दोन प्रकार मिळतात, हरकेन आणि अॅव्हेन्टेडोर. नरेंद्र मेहतांकडे हरकेन ही कार आहे. तिची किंमत 5 कोटी ते साडेपाच कोटींच्या घरात आहे. 3 सेकंदात ही कार 100 किमी प्रतितास इतका वेग गाठू शकते. ही कार तब्बल 350 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने धावू शकते. मोठमोठे सेलिब्रिटीज ही कार पसंत करतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement