एक्स्प्लोर
CDR लीक प्रकरण : व्होडाफोनसह 7 मोबाईल कंपन्या चौकशीच्या घेऱ्यात
ठाणे गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या सीडीआर प्रकरणात खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक केल्यानंतर, काल ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ठाणे : मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) लीक प्रकरणी 7 मोठ्या टेलिकॉम कंपन्या चौकशीच्या घेऱ्यात आल्या आहेत. ठाणे गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, 7 मोबाईल टेलिकॉम कंपन्यांच्या 177 मोबाईल नंबरचे सीडीआर प्रसिद्ध खासगी गुप्तहेर रंजनी पंडित आणि इतर आरोपींकडून जप्त केले आहेत. त्यामुळे या कंपन्यांनाही चौकशीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.
व्होडाफोन, एअरटेल, एअरसेल, आयडिया, टाटा, जिओ आणि यूनिनॉर या 7 टेलिकॉम कंपन्यांच्या मोबाईल नंबरचे सीडीआर आरोपींनी पैसे देऊन खरेदी केले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, टेलिकॉम कंपन्यांना माहिती असल्याशिवाय कोणत्याही मोबाईल नंबरचे सीडीआर म्हणजेच कॉल डेटा रेकॉर्ड मिळू शकत नाही. त्यामुळे पोलिस आता टेलिकॉम कंपन्यांची चौकशी करणार आहे, जेणेकरुन सीडीआर कंपनीकडून चोरला गेला की या कंपन्यांमधीलच कुणी व्यक्ती या प्रकरणात सहभागी आहे.
ठाणे गुन्हे शाखेने या सातही टेलिकॉम कंपन्यांशी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करणार आहे. पोलिसांनी ईमेलद्वारे कंपन्यांकडून यासंबंधी उत्तर मागवले असून, त्यानंतर अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ साहू याला शोधण्यासाठी ठाणे गुन्हे शाखेची एक टीम दिल्लीत पोहोचली आहे. सौरभ साहू हा रजनी पंडित यांना गेल्या काही वर्षांपासून सीडीआर पुरवत होता. सौरभ सीडीआर कुठून मिळवत असे, या माहितीसाठी सौरभची अटक महत्त्वाची आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, एका नंबरच्या सीडीआरची किंमत 10 ते 12 हजार रुपये असतं. कौटुंबिक वाद, मॅट्रिमोनियल वेबसाईटवर लग्न नक्की झाल्यानंतर मुलगा-मुलगीची माहिती मिळवण्यासाठी आरोपी सीडीआर मिळवत होते. त्याशिवाय, विमा कंपनीचे लोक विम्याची रक्कम देण्याआधी चौकशीसाठी सीडीआरचा वापर करत होते.
या सीडीआर प्रकरणात आणखी मोठी नावं बाहेर येतील, असा पोलिसांना विश्वास आहे. पोलिसांचा या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या तपासात आता कुणा-कुणाची नावं समोर येतील, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
रजनी पंडित यांना पोलिस कोठडी
ठाणे गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या सीडीआर प्रकरणात खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक केल्यानंतर, काल ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणातील इतर सात जणांनाही अटक करण्यात आली आहे. ते सातही जण सध्या पोलिस कोठडीत आहेत.
संबंधित बातम्या :
कॉल डिटेल्स रेकॉर्डिंग लीक प्रकरणी महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक
महिला खाजगी गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement