एक्स्प्लोर

मनसेची 6 नगरसेवकांचं सदस्यपद रद्द करण्यासाठी याचिका

मनसेतून शिवसेनेत गेलेल्या 6 नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी मनसेनं केलेली याचिका कोकण भवन आयुक्तांनी दाखल करून घेतली आहे.

मुंबई : मनसेतून शिवसेनेत गेलेल्या 6 नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी मनसेनं केलेली याचिका कोकण भवन आयुक्तांनी दाखल करून घेतली आहे. या याचिकेची सुनावणी होईपर्यंत 6 नगरसवेकांच्या नवीन गटाला मान्यता दिली जाणार नसल्याचं कोकण भवन आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. मनसेसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दरम्यान, हातावर शिवबंधन बांधून घेतलेले 6 नगरसेवकांची शिवसेनेचे नगरसेवक म्हणून नोंदणी होणार की त्यांचं सदस्यत्व रद्द होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दुसरीकडे शिवसेना-मनसे या दोन्ही पक्षांच्या याचिकांवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत ६ नगरसेवक अधिकृतरित्या मनसेचेच राहतील असा दावा मनसेनं केला आहे. दरम्यान, कोकण भवन आयुक्तांनी ही याचिका दाखल करुन घेतल्यानं शिवसेनेला मात्र, मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार तसेच यावेळी भाजपनं नेमकी कोणती खेळी खेळणार या सर्वच गोष्टींकडे मुंबईकरांचं लक्ष लागून राहिलं आहे. मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत काही दिवसांपूर्वी 13 ऑक्टोबरला मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक शिवसेनेते गेले होते. त्यामुळे मुंबई महापालिकेतील शिवसेनेचं संख्याबळ वाढलं होतं. मात्र त्यापैकी परमेश्वर कदम, हर्षला मोरे, दत्ताराम नरवणकर, अर्चना भालेराव यांनी मनसेशी संपर्क साधल्याचं सांगितलं जात आहे. मनसेचे नगरसेवक फोडून भाजपला शह भांडुप पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या पराभवानंतर भाजप बरीच आक्रमक झाली होती. ‘लवकरच मुंबईत आमचा महापौर बसवू.’ असं वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले होतं. भाजपच्या संभाव्य खेळी लक्षात घेऊन शिवसेनेनं तात्काळ एक भन्नाट चाल खेळत मनसेच्या तब्बल 6 नगरसेवकांना फोडलं होतं. या सर्व घडामोडीत शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र याबाबत मनसेने कोकण आयुक्तांकडे तक्रार केली होती. संबंधित बातम्या : शिवसेनेत गेलेल्या मनसेच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा दाखल होणार? मनसेकडून नगरसेवकांना व्हीप जारी, सभागृहात कोण- कुठे बसणार? मनसेतून आलेले सर्व सहा नगरसेवक आमच्यासोबतच : शिवसेना

शिवसेनेत गेलेले 4 नगरसेवक पुन्हा मनसेत परतणार?

7 नगरसेवक, 13 आमदार ते मनसेकडे उरलेला एकटा नगरसेवक

पहिल्या मास्टरस्ट्रोकनंतर शिवसेनेची तात्काळ दुसरी खेळी!

शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, मनसेचे सहा नगरसेवक सेनेसोबत

मनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक कोण?

मॉकड्रीलचं कारण देत मुंबई महापालिकेच सर्व दरवाजे बंद!

करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप

दगाफटका योग्य नाही, नगरसेवकांवर राज ठाकरे भडकले

‘लवकरच मुंबईत आमचा महापौर’, सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग

Embed widget