Sanitary Pad Dispensing Machine : मध्य रेल्वेच्या स्थानकांवर 50 सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन, 5 रुपयांना मिळणार पॅड
Sanitary Pad Dispensing Machine : मासिक पाळीदरम्यान महिलांच्या सोयीसाठी, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने स्थानकांवर आणि महिलांच्या स्वच्छतागृहांमध्ये 50 सॅनिटरी पॅड वेंडिंग मशिन बसवल्या आहेत.
Sanitary Pad Dispensing Machine : मासिक पाळीदरम्यान महिलांच्या सोयीसाठी, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने स्थानकांवर आणि वेटिंग हॉलमधील महिलांच्या स्वच्छतागृहांमध्ये 50 सॅनिटरी पॅड वेंडिंग मशिन बसवल्या आहेत. स्थानकात महिलांना चांगल्या सुविधा देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. सीएसएमटी स्थानकामध्ये पहिलं सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन बसवण्यात आलं आहे. या मशिनमधून अवघ्या 5 रुपयांत सॅनिटरी पॅड उपलब्ध होईल, असं मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
Mumbai Division of Central Railway has installed 50 Sanitary Napkin Vending Machines at Ladies Toilets/ Waiting Halls at stations.
— Ministry of Railways (@RailMinIndia) December 1, 2021
Napkins can be obtained with a ₹5 coin. First such machine installed at CSMT station. pic.twitter.com/iDCkOdeyLq
यापूर्वी, पश्चिम रेल्वेने (WR) चर्चगेट येथील मुख्यालयासह सहा विभागांमध्ये आपल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन बसवल्या होत्या. तेथे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची या मशिनमुळे मोठी सोय झाली.
चर्चगेटशिवाय या स्थानकावरही मशिन उपलब्ध
चर्चगेट व्यतिरिक्त, वडोदरा, अहमदाबाद, रतलाम, राजकोट आणि भावनगर या इतर पाच विभागांमध्ये सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिन बसवण्यात आली होती आणि तिथे काम करणाऱ्या सर्वात ज्येष्ठ किंवा सर्वात तरुण महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते त्यांचं उद्घाटन करण्यात आलं. याशिवाय, मासिक पाळीच्या काळात महिलांना चांगल्या सुविधा देण्यासाठी महाराष्ट्रातील नऊ कारागृहांनी त्यांच्या आवारात सॅनिटरी पॅड डिस्पेन्सर आणि डिस्पेन्सर मशीन बसवले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Kalachowki Kidnapping Case : काळाचौकी परिसरातून गायब झालेल्या चिमुकलीचा शोध संपला, मुलगी नको होती म्हणून आईनेच केली हत्या
- Omicron Variant Cases in India : भारतात ओमिक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव, कर्नाटकात व्हेरियंटचे दोन रुग्ण
- Parliament Session : राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, 'सरकार सत्याला घाबरतं'