Kalachowki Kidnapping Case : काळाचौकी परिसरातून गायब झालेल्या चिमुकलीचा शोध संपला, मुलगी नको होती म्हणून आईनेच केली हत्या
मुलगी नको होती म्हणून तिच्या आईनेच मुलीची हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. पोटच्या मुलीलीच तिच्या आईने हत्या केल्यानं खळबळ उडाली आहे.
मुंबई : काळाचौकी परिसरातून बेपत्ता झालेल्या तीन महिन्याच्या चिमुकलीच्या अपहरण नाट्याचं धगधगतं वास्तव समोर आलं आहे. बेपत्ता मुलीचा शोध संपला असून, आईनेच मुलीची हत्या केल्याचं दाहक वास्तव समोर आलं आहे. मुलगी नको होती म्हणून आईनेच हत्या करुन चिमुकलीचा मृतदेह पाण्याच्या टाकीत ठेवला. त्यामुळे हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेतील चिमुकलीचा शोध आता थांबला आहे. दोन दिवसापूर्वी काळाचौकी परिसरातून तीन महिन्याची चिमुकली गायब झाली होती. मात्र आता आईनेच मुलीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जुन्या मोबाईलच्या बदल्यात भांडी देतो असं सांगून महिलेला बेशुद्ध केलं आणि तिच्या तीन महिन्यांच्या बाळाचं अपहरण करण्यात आल्याचा गुन्हा नोंद झाला होता. अवघ्या तीन महिन्याच्या चिमुकलीची हत्या केली आणि तिला घरातल्या पाण्याच्या टाकीत टाकलं. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर सत्य उघड झालं आहे.
नेमकं प्रकरण काय?
दुर्दैवी चिमुकली जेव्हापासून गायब होती, तेव्हा तिच्या आईने दिलेली माहिती चकीत करणारी होती. सपना यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 नोव्हेंबरला त्या घरी एकट्याच होत्या. त्यावेळी दुपारी 12 ते 1 च्या सुमारास एक 30 ते 35 वर्षाची महिला आली. जुन्या मोबाइलच्या बदल्यात नवीन भांडी देण्याचं सांगून आरोपी महिलेने सपना मगदूम यांचा विश्वास संपादन केला.
सपना मगदूम यांची तीन महिने पंधरा दिवसांची मुलगी वेदा ही पलंगावर झोपली होती. आरोपी महिलेला देण्यासाठी घरात असलेला जुना मोबाईल आणण्यासाठी सपना मगदूम आतल्या खोलीत जात होत्या. तेवढ्यात आरोपी महिला पाठी मागून आली आणि तिनं बेशुद्ध करण्याचं औषध सपना यांच्या नाकाला लावून त्यांना बेशुद्ध केलं. पलंगावर झोपलेल्या तीन महिन्यांच्या चिमुकलीला या महिलेने उचललं आणि आपल्या सोबत घेऊन पसार झाली, असा दावा सपना मगदूम यांनी केला होता.
पोलिसी खाक्यानंतर सत्य उघड
दरम्यान, पोलिसांनी याप्रकरानंतर जोमाने तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांना या तपासादरम्यान काळंबेरं आलं. पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यानंतर सपना यांनी आपणच हे कृत्य केल्याचं मान्य केलं.
संबंधित बातम्या :