एक्स्प्लोर

हायकोर्टाच्या मनाईनंतरही मुंबईत 44 बेकायदेशीर मंडपांना परवानगी, बीएमसीची कबुली

आदेश देऊनही बेकायदेशीर मंडप नियमित करणाऱ्या अधिकाऱ्यांचा तपशील आणि त्यांच्यावर केलेल्या कारवाईचा तपशील सोमवारच्या सुनावणीत सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने पालिकेला दिलेत.

मुंबई : बेकायदेशीर मंडप उभारण्याची परवानगी देऊ नका, असा स्पष्ट आदेश असतानाही मुंहई महापालिकेच्या 13 अधिकाऱ्यांनी विविध वॉर्डात मिळून एकूण 44 बेकायदेशीर मंडपांना परवानगी दिल्याचं खुद्द मुंबई महानगरपालिकेने कबूल केलंय. आदेश देऊनही बेकायदेशीर मंडप नियमित करणाऱ्या अधिकाऱ्यांचा तपशील आणि त्यांच्यावर केलेल्या कारवाईचा तपशील सोमवारच्या सुनावणीत सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने पालिकेला दिलेत. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारवाईचे संकेतही पालिकेला देण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे महापालिकेच्या पाहणी पथकाने गणेशोत्सवादरम्यान उभारले जाणारे मंडप हे कायदेशीर आहेत की नाही हे तपासणीचं काम संपवल्यानंतर त्याचा अहवाल बुधवारी हायकोर्टात सादर करण्यात आला. यात पालिकेच्याच काही अधिकाऱ्यांनी मंडप उभारण्यासाठी बेकायदेशीर परवानगी दिल्याची धक्कादायक बाब नमूद केली आहे. या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचंही पालिकेने आपल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केलं आहे. जाणूनबुजून कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असंही बीएमसीने कबूल केलं आहे. हायकोर्टाने बेकायदा मंडपांविरोधात कारवाई करण्याच्या आदेशाच्या अंमलबजावणीत कोणतीही चालढकल केली जाणार नाही असंही बीएमसीने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. तसंच नवरात्रीच्यावेळी बेकायदा मंडप उभारले जाऊ नयेत यासाठी आत्तापासूनच कठोर पाऊलं उचलली जातील याची दक्षताही घेणार असल्याचं मुंबई मनपाने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. ठाण्यातील डॉ. महेश बेडेकर यांनी सणउत्सवातील बेकायदेशीर मंडपांविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिलेल्या निर्देशांनुसार मुंबई महानगरपालिकेने हा अहवाल हायकोर्टात सादर केला. मुंबईत गणेशोत्सवादरम्यान बेकायदा मंडपांवर काय कारवाई करण्यात आली याची माहिती पालिकेने हायकोर्टात सादर केली. यंदा मंडपांच्या परवानगीसाठी ऑनलाईन पद्धत अवलंबण्यात आली होती. मुंबई शहरात परवनागी मागितलेल्या एकूण 552 मंडपांच्या जागेची पाहणी करण्यात आली. त्यातील 517 मंडपांना परवनागी दिली गेली. यातील एक मंडप बीपीटीच्या जागेवर होता, तर दोन पीडब्ल्यूडीच्या जागेवर होते. याशिवाय दोन मंडपांना बांधकाम पाडण्याची नोटीस देऊन ते हटवण्यात आले. मुंबई उपनगरात एकूण 341 मंडपांची पाहणी करण्यात आली आणि त्यातील 264 मंडपांना परवानगी देण्यात आली. नियमात बसत नसल्याने 30 मंडप हटवण्यात आले. तर 47 मंडप हे खासगी जागा, टेकडी, जिल्हाधिकारी जमीन आणि झोपडपट्टीत उभारण्यात आले होते. अशा प्रकारे एकूण मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारक्षेत्रात एकूण 863 मंडपांची पाहणी केली आणि बेकायदेशीर असलेले सगळे मंडप हटवण्यात आले असल्याची माहिती पालिकेने हायकोर्टात दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Missing Link Mumbai Pune Expressway: मिसिंग लिंकवर दरड कोसळण्यासाठी नेहरु जबाबदार; संदीप देशपांडेंचा फडणवीस सरकारला टोला
मिसिंग लिंकवर दरड कोसळण्यासाठी नेहरु जबाबदार; संदीप देशपांडेंचा फडणवीस सरकारला टोला
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट; वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात
महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; रायगड, नाशिक, मुंबईसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट; वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात
Mumbai Rain Local Train Updates Marathi News: विरारपर्यंत लोकल सेवा पूर्ववत; पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
विरारपर्यंत लोकल सेवा पूर्ववत; पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स,

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Heavy Rain Alert: नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
Mumbai Rain Local Train Updates Marathi News: विरारपर्यंत लोकल सेवा पूर्ववत; पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
विरारपर्यंत लोकल सेवा पूर्ववत; पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स,
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Missing Link Mumbai Pune Expressway: मिसिंग लिंकवर दरड कोसळण्यासाठी नेहरु जबाबदार; संदीप देशपांडेंचा फडणवीस सरकारला टोला
मिसिंग लिंकवर दरड कोसळण्यासाठी नेहरु जबाबदार; संदीप देशपांडेंचा फडणवीस सरकारला टोला
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
Embed widget