भिवंडीत एका तासात 40 दुचाकी स्वारांचा अपघात; 25 जण जखमी
भिवंडीत एका तासात जवळपास 40 दुचाकी स्वारांचा अपघात झाला असून 20 ते 25 जण या अपघातात जखमी झाले आहेत.
मुंबई : भिवंडीतील चाविन्द्रा मार्गावर पोगाव गावाच्या परिसरात एका तासात 35 ते 40 दुचाकी स्वारांचा घसरून पडल्याने अपघात झाला. या अपघातात 20 ते 25 जण जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, चाविन्द्रा मार्गावर पोगाव गाव परिसरात मोठ्या प्रमाणावर दारू भट्टीचं (बियरचा) वेस्टेज मटेरियल एक ते दीड किलोमीटरपर्यंत सांडल्याने हे अपघात झाले आहेत.
दारू भट्टीचं (बियरचा) वेस्टेज मटेरियल तेलकट असल्याने अनेक दुचाकी स्वार घसरून पडून अपघात झाले आहेत. या अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तसेच या घटनेटची सुचना स्थानिक भिवंडी तालुका पोलीस आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्याचा पावर करून दोन तासांमध्ये रस्त्यावर सांडलेला दारूचं वेस्टेज हटवलं आणि माती टाकून वाहतूक सुरू केली. तर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.
मध्य रात्रीच्या सुमारास भिवंडी-चाविंन्द्रा या मार्गावर नाशिकजवळून दारू भट्टीचं (बियरचा) वेस्टेज मटेरियल वसईच्या कामन येथील एका तबेल्यात नेण्यात येतो. अशाच माल तबेल्यात नेताना ओव्हरलोड झाल्याने पोगाव परिसरापासून ते मिल्लतनगर पर्यंत एक ते दीड किलोमीटर अंतरावर सांडला होता. तसेच हे वेस्टेज तेलकच व चिकट असल्याने पोगाव ते मित्तलनगर या परिसरात सुमारे 35 ते 40 दुचाकी स्वार घसरून पडले. या अपघातात 20 ते 25 जण जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
संबंधित बातम्या :
आइसक्रीम देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दगडाने ठेचून हत्या
लघुशंकेच्या वादातून दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न, दोन गंभीर