एक्स्प्लोर

आइसक्रीम देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दगडाने ठेचून हत्या

भिवंडीत एका सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हे कृत्य ओळखीच्या व्यक्तीने केले असल्याचा पोलीसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी आरोपी भारत कोरीला अटक करण्यात आली आहे.

मुंबई : हैदराबाद, उन्नाव येथील मुलीवर बलात्कार आणि हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेमुळे देशातील स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यात भिवंडीतही अशाच प्रकारची एक घटना घडली आहे. तालुक्यातील एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून नराधमाचा शोध पोलीस घेत आहेत. भिवंडी तालुक्यात एक कुटुंब मागील तीन वर्षांपासून इथं राहत आहे. ते मुळचे यूपी मधील देवराया येथील रहिवासी आहेत. उपजीविका भागवण्यासाठी हे कुटुंब घरातच खानावळ चालवतात. पीडित अल्पवयीन मुलगी दुसरी इयत्तेत शिकत असून ती सात वर्षांची आहे. काल रात्री दहाच्या सुमारास पीडित मुलगी ही घराबाहेर खेळत असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मुलीला आयस्क्रीम देण्याच्या बहाण्याने तिच्या घरापासून 50 मीटर दूर असलेल्या झाडीझुडपांत नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला व पुरावा नष्ट करण्यासाठी शेजारी पडलेल्या दगडाने मुलीचा चेहरा ठेचून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर दुसरीकडे आपली मुलगी घरी न आल्याने मुलीच्या आई-वडिलांनी शोध घ्यायला सुरुवात केली. परंतु, रात्री उशिरापर्यंत मुलगी मिळून न आल्याने कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. सकाळच्या सुमारास एका व्यक्तीने घरापासून 50 मीटर दूर असलेल्या झुडपात मुलीचा मृतदेह असल्याची माहिती पीडितेच्या कुटुंबीयांना दिली. तसेच ही माहिती पोलीसांना कळवण्यात आली. घटनास्थळी पीडित मुलीचा मुतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, चेहरा पूर्णपणे दगडाने ठेचून विद्रुप करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसानी अज्ञाताविरोधात बलात्कार व हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. पीडित मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. नराधम मात्र मोकाट आहे. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी पीडित मुलीच्या आईने केली होती. तसेच घटनास्थळी भिवंडी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे व ठाणे, भिवंडी गुन्हेशाखा, डॉगस्कॉडची टीम दाखल झाली होती. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी ओळखीचा असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आरोपी सध्या फरार असला तरी त्याची लिंक मिळाली आहे. त्यामुळे लवकरच आरोपी पोलीसांच्या ताब्यात असेल, अशी माहिती भिवंडी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे. याप्रकरणी नराधम आरोपी भारत कोरी (वय 32) याला अटक करण्यात आली आहे. हेही वाचा - आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही बलात्काऱ्यांना शंभर दिवसांत फाशी? जानेवारीत प्रस्ताव आणणार : सूत्र Anna Hazare | निर्भया प्रकरणातल्या नराधमांना फाशी द्या : अण्णा हजारे | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray on Delhi CJP Protest: या देशाने सगळ्यांचा माज उतरवलाय! मोदी-शाहांची पराकोटीची हुकूमशाही, बेबंदशाहीला उखडून काढलं पाहिजे; राज ठाकरेंची खरमरीत पोस्ट
या देशाने सगळ्यांचा माज उतरवलाय! मोदी-शाहांची पराकोटीची हुकूमशाही, बेबंदशाहीला उखडून काढलं पाहिजे; राज ठाकरेंची खरमरीत पोस्ट
CJP Protest Delhi LIVE Updates: अभिजीत दिपकेंचं विमान दिल्ली विमानतळावर लँड होताच, फुल्ल हायव्होल्टेज ड्रामा, महिला पोलिसांनी विमानात घुसून ताब्यात घेतलं
CJP Protest Delhi LIVE Updates: अभिजीत दिपकेंचं विमान दिल्ली विमानतळावर लँड होताच, फुल्ल हायव्होल्टेज ड्रामा, महिला पोलिसांनी विमानात घुसून ताब्यात घेतलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
Raj Thackeray on Delhi CJP Protest: या देशाने सगळ्यांचा माज उतरवलाय! मोदी-शाहांची पराकोटीची हुकूमशाही, बेबंदशाहीला उखडून काढलं पाहिजे; राज ठाकरेंची खरमरीत पोस्ट
या देशाने सगळ्यांचा माज उतरवलाय! मोदी-शाहांची पराकोटीची हुकूमशाही, बेबंदशाहीला उखडून काढलं पाहिजे; राज ठाकरेंची खरमरीत पोस्ट
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Embed widget