एक्स्प्लोर

मुंबईकरांचा कचरा आमच्या माथी का मारता? अंबरनाथमधील 25 गावांचा विरोध

अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे, नारण, वाडे, नितलज ग्रामपंचायतींना एमएमआरडीएकडून जमीन हस्तांतरणासंदर्भात नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या जागेवरील सातबारा असलेल्या शेतकऱ्यांनाही नोटिसा देण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई : मुंबई महानगरपालिकेने मुलुंड येथील डम्पिंग ग्राऊंड बंद केल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा कचरा टाण्यास नवीन जागा शोधली आहे. मुंबईबाहेर असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडाच्या पायथ्याशी ही जागा असून, 300 एकर जागेवर हे डंम्पिंग ग्राऊंड उभ्यारण्यात येणार आहे. मात्र, अंबरनाथमधील 25 गावातील गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. यासाठी गावकऱ्यांनी संघर्ष समितीची स्थापना केली असून, तीव्र आंदोलनाचाही इशारा दिलाय. त्याचबरोबर सरकारच्या या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेण्यात येणार आहे. मंबईमध्ये दिवसाला प्रचंड प्रमाणात साठणाऱ्या घणकचऱ्याची विल्हेवाट लावायची कशी, असा प्रश्न सध्या मुंबई महापालिकेसमोर उभा राहिला आहे. शहरातील अनेक डम्पिंग ग्राऊंड कचऱ्याने ओव्हरफ्लो झाल्याने भविष्यातील कचऱ्याचे काय करायचे याने पालिकेला सतावले आहे. यासाठी पालिकेने सरकारला साकडे घालत मुंबईच्या बाहेर असलेल्या अंबरनाथ तालूक्यात डम्पिंग ग्राऊंड उभारले जाणार आहे. मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या मोकळ्या विस्तीर्ण जागेत 300 एकर जागेवर हे डम्पिंग तयार होणार आहे. यासाठी सध्या एमएमआरडीएकडून शेतकरी आणि येथील स्थानिक ग्रामपंचायतींना नोटिसा देण्याचे काम सुरु आहे. सरकराच्या या निर्णयाला अंबरनाथमधील 25 गावातील गावकऱ्यांनी विरोध केला आहे. मुंबई शहराचा घनकचरा आमच्या माथी का मारता, असा सवाल गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. मोठ्या प्रमाणात येणाऱ्या या कचऱ्यामुळे येथील निसर्गसंपन्न वातावरण खराब होणार असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. डम्पिंग ग्राऊंडमुळे येथील शेतकरी कसत असलेली शेती नष्ट होणार आहे. केमिकलयुक्त पाण्यामुळे येथील ओढा- नदीचे पात्र दूषित होणार असल्याने मासेमारी नष्ट होण्याची शक्यता आहे. यामुळे गावकऱ्यांच्या उदरनिर्वाहावरच घाला येणार आहे. अंबरनाथ तालुक्यात येणाऱ्या उसाटणे, नारण, वाडे, नितलज ग्रामपंचायतींना एमएमआरडीएकडून जमीन हस्तांतरणासंदर्भात नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या जागेवरील सातबारा असलेल्या शेतकऱ्यांनाही नोटिसा देण्यात आल्या आहेत. एमएमआरडीएच्या माध्यमातून राज्य सरकार जमिनी घेऊन डम्पिंग ग्राऊंड उभा करणार असल्याने, आता याविरोधात येथील 25 गावातील शेतकरी एकवटले आहे. त्यांनी संघर्ष समितीची स्थापना केली असून याला तीव्र विरोध करण्यासाठी आंदोलनाच्या पवित्रा घेतला आहे. कोकण आयुक्तांकडे गेल्या महिन्यात याबाबत बैठक पार पडली असून यात बैठकीतही डम्पिंग ग्राऊंडला विरोध कायम असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
भाड्याने वाहन लावून देण्याचं आश्वासन, महिलेकडून तब्बल 33 लाखांची फसवणूक, दिंडोशी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीला मध्य प्रदेशातून अटक 
भाड्याने वाहन लावून देण्याचं आश्वासन, महिलेकडून तब्बल 33 लाखांची फसवणूक, दिंडोशी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीला मध्य प्रदेशातून अटक 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget