एक्स्प्लोर

एल्फिन्स्टन दुर्घटना : वडिलांशी चुकामूक श्रद्धाच्या जीवावर बेतली

20 वर्षीय श्रद्धा परळमधल्या कामगार संघात आपल्या वडिलांसोबतच कामाला होती. आजही ती वडिलांसोबतच विठ्ठलवाडीहून परळला जाण्यासाठी निघाली. परळला पोहचल्यावर श्रद्धाच्या पायाला काही लागलं आणि ती मध्येच अडखळली.

मुंबई : एलफिन्स्टनच्या पादचरी पुलावरच्या दुर्घटनेनं मुंबईला दिलेली जखमी कधीच भरून निघणारी नाही. या दुर्घटनेत कुणी आपली मुलगी गमावली, कुणी आई गमावली तर कुणी जवळचा मित्र गमावला. कल्याण जवळच्या विठ्ठलवाडीमध्ये राहणाऱ्या वरपे कुटुंबियानं सर्वांच्या लाडक्या श्रद्धाला गमावलं आहे. पाच मिनिटांसाठी श्रद्धा आणि तिच्या वडिलांची चुकामूक झाली आणि होत्याचं नव्हतं झालं. 20 वर्षीय श्रद्धा परळमधल्या कामगार संघात आपल्या वडिलांसोबतच कामाला होती. आजही ती वडिलांसोबतच विठ्ठलवाडीहून परळला जाण्यासाठी निघाली. परळला पोहचल्यावर श्रद्धाच्या पायाला काही लागलं आणि ती ठेचकाळली. त्याचदरम्यान, तिची आणि वडिलांची चुकामूक झाली. त्यानंतर श्रद्धा जेव्हा पुढे आली तेव्हा एल्फिन्स्टन पुलावर प्रचंड गर्दी झाली होती आणि याच गर्दीनं 20 वर्षीय श्रद्धाचा हकनाक बळी घेतला. बाबांच्या सोबतीनं कामाला जाणारी, घरकामात मदत करणऱ्या श्रद्धाच्या अकाली निधनानं तिच्या कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला आहे. नेमकी घटना काय? मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर  मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 39 प्रवासी जखमी झाले आहेत. आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास फूट ओव्हर ब्रिजवरील पत्रा कोसळल्याची ओरड झाली. यामुळे ब्रिजवरील प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं. त्यातच ब्रिज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रिजवरील प्रवाशांमध्ये एकच हलकल्लोळ माजला. त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे श्वास गुदमरुन आणि चिरडून 22 जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाईकांना रेल्वे आणि राज्य सरकारतर्फे प्रत्येकी पाच लाख या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा राज्य सरकारने केली आहे, तर जखमींवरील उपचारांचा सर्व खर्च सरकार उचलणार आहे. गरज पडल्यास जखमींना उपचारांसाठी इतरत्र हलवण्यात येईल, असंही मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. संबंधित बातम्या : एल्फिन्स्टन दुर्घटना : ऑफिसच्या शेवटच्या दिवशी तेरेसा फर्नांडिस यांचा मृत्यू दसऱ्यासाठी फुलं आणायला गेलेल्या दोन मैत्रिणींचा चेंगराचेंगरीत दुर्दैवी अंत एल्फिन्स्टन दुर्घटनेत ज्योतिबा चव्हाण यांचा मृत्यू कुटुंबाचा एकमेव आधार हरपला, मयुरेशचा चेंगराचेंगरीत दुर्दैवी मृत्यू दहीहंडीला सलामी देणाऱ्या गोविंदाचा चेंगराचेंगरीत दुर्दैवी अंत एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : 61 वर्षीय आलेक्स कोरीयांचा गुदमरुन मृत्यू एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीची घटना अतिशय धक्कादायक : मुख्यमंत्री बुलेट ट्रेनआधी मुंबईच्या लोकलकडे लक्ष द्या! एल्फिन्स्टन-परेलला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : 22 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? एल्फिन्स्टन स्टेशनवर नेमकं काय घडलं? एलफिन्स्टन चेंगराचेंगरी: कोणाला किती मदत?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena UBT : कोकणात शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर, ठाकरेंचा तळकोकणातला शिलेदार तडकाफडकी मातोश्रीवर पोहोचला; चर्चांना उधाण
कोकणात शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर, ठाकरेंचा तळकोकणातला शिलेदार तडकाफडकी मातोश्रीवर पोहोचला; चर्चांना उधाण
अजित पवारांनीच हा निर्णय घ्यायला पाहिजे; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत महायुती सरकारमधील मंत्र्याचं स्पष्ट मत
अजित पवारांनीच हा निर्णय घ्यायला पाहिजे; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत महायुती सरकारमधील मंत्र्याचं स्पष्ट मत
Kolhapur Football : कोल्हापूर फुटबाॅल! भावा इथं प्रत्येक विषय हार्डच असतो, शाहू स्टेडियमवर फायनल पाहण्यासाठी अलोट गर्दीचा महापूर
कोल्हापूर फुटबाॅल! भावा इथं प्रत्येक विषय हार्डच असतो, शाहू स्टेडियमवर फायनल पाहण्यासाठी अलोट गर्दीचा महापूर
'आंतरधर्मीय विवाहाला लव्ह जिहाद म्हणणं चुकीचं' केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा कायद्याला विरोध
'आंतरधर्मीय विवाहाला लव्ह जिहाद म्हणणं चुकीचं' केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा कायद्याला विरोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Paragliding For exam : पेपरला उशीर, घाटात ट्रॅफिक जॅम; पॅराग्लायडिंगने पोहोचला परीक्षा केंद्रावरVaibhav Naik Meets Uddhav Thackeray : वैभव नाईक मातोश्रीवर, ठाकरेंसोबत करणार चर्चाKrushi Mahotsav Amravati : अमरावतीत कृषिमहोत्सव, सरकारच्या कृषी धोरणावर शेतकऱ्याची रोखठोक मतंDhananjay Deshmukh : धनंजय देशमुखांचा बावनकुळेंवर हल्लाबोल,म्हणाले, आमच्यासाठी तत्परता का नाही..?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena UBT : कोकणात शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर, ठाकरेंचा तळकोकणातला शिलेदार तडकाफडकी मातोश्रीवर पोहोचला; चर्चांना उधाण
कोकणात शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर, ठाकरेंचा तळकोकणातला शिलेदार तडकाफडकी मातोश्रीवर पोहोचला; चर्चांना उधाण
अजित पवारांनीच हा निर्णय घ्यायला पाहिजे; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत महायुती सरकारमधील मंत्र्याचं स्पष्ट मत
अजित पवारांनीच हा निर्णय घ्यायला पाहिजे; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत महायुती सरकारमधील मंत्र्याचं स्पष्ट मत
Kolhapur Football : कोल्हापूर फुटबाॅल! भावा इथं प्रत्येक विषय हार्डच असतो, शाहू स्टेडियमवर फायनल पाहण्यासाठी अलोट गर्दीचा महापूर
कोल्हापूर फुटबाॅल! भावा इथं प्रत्येक विषय हार्डच असतो, शाहू स्टेडियमवर फायनल पाहण्यासाठी अलोट गर्दीचा महापूर
'आंतरधर्मीय विवाहाला लव्ह जिहाद म्हणणं चुकीचं' केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा कायद्याला विरोध
'आंतरधर्मीय विवाहाला लव्ह जिहाद म्हणणं चुकीचं' केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा कायद्याला विरोध
पेपरला 15 मिनिटे, घाटात ट्रॅफिक जाम, पाचगणीचा पठ्ठ्या थेट पॅराग्लायडिंगने परीक्षा केंद्रावर पोहोचला!
पेपरला 15 मिनिटे, घाटात ट्रॅफिक जाम, पाचगणीचा पठ्ठ्या थेट पॅराग्लायडिंगने परीक्षा केंद्रावर पोहोचला!
HSRP Number Plate म्हणजे नेमकं काय रे भाऊ, किंमत काय अन् बुकिंग कसं कराल? जाणून घ्या
HSRP Number Plate म्हणजे नेमकं काय रे भाऊ, किंमत काय अन् बुकिंग कसं कराल? जाणून घ्या
Shikhar Dhawan : दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला! दोन वर्ष भेटलो नाही, वर्षभरापासून बोललो नाही, लेकाच्या आठवणीने शिखर धवनमधल्या बापाला हुंदका आवरेना
Video : दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला! दोन वर्ष भेटलो नाही, वर्षभरापासून बोललो नाही, लेकाच्या आठवणीने शिखर धवनमधल्या बापाला हुंदका आवरेना
ताक पिण्याचे '4' आरोग्यदायी फायदे!
ताक पिण्याचे '4' आरोग्यदायी फायदे!
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.