एक्स्प्लोर
मुंबईच्या चिंचपोकळी गणेश उत्सव मंडळाला 100 वर्ष पूर्ण, गणेश मंडळाकडून पूरग्रस्तांना 5 लाखांची मदत
मुंबईच्या चिंचपोकळी गणेश उत्सव मंडळाला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होता आहेत. आज मोठ्या उत्साहात चिंतमणीचा आगमन सोहळा पार पडला.
मुंबई : मुंबईच्या चिंचपोकळी गणेश उत्सव मंडळाला यंदा 100 वर्ष पूर्ण होत आहे. आज या चिंतामणीचा आगमन सोहळा मुंबई पार पडला. यावेळी राज्यातील पूरपरिस्थितीची जाण ठेवून गणेश मंडळाकडून पूरग्रस्तांना 5 लाखांची मदत करण्यात येत आहे. तसेच यंदा गणेशोत्सवात दानपेटीत जमा होणारी संपूर्ण रक्कम पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्या येणार आहे.
मुंबईच्या चिंचपोकळी गणेश उत्सव मंडळाला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होता आहेत. आज मोठ्या उत्साहात चिंतमणीचा आगमन सोहळा पार पडला. एकीकडे चिंतामणीचे शतक महोत्सवी वर्ष तर दुसरीकडे राज्यात पूरस्थिती असल्याने या गणेश मंडळाकडून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा करण्यात आले आहेत.
Chinchpokli cha Chintamani Aagman Sohala 2019 | मुंबईच्या चिंचपोकळी गणेश उत्सव मंडळाला 100 वर्ष पूर्ण, पूरग्रस्तांना 5 लाखांची मदत | ABP Majha
गेल्या आठ दिवसांपासून सांगली, कोल्हापूर परिसरात महापूरानं थैमान घातलं आहे. लाखो लोकांना या महापुरामुळे विस्थापित व्हावं लागलं आहे. या महापुरामुळे करोडो रुपयांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सव काळात चिंचपोकळी गणेश उत्सव मंडळात दानपेटीत जमा होणारी संपूर्ण रक्कम पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यात येणार आहे. एकीकडे 100 वर्ष पूर्ण होण्याचा उत्साह जरी मंडळामध्ये असला तरी सामजिक बांधिलकीची जाण या हे मंडळ दाखवत असल्याने त्यांच्या या भूमिकेचं कौतुक केलं जात आहे.
एनडीआरएफ जवानाला स्थानिक महिलांनी राखी बांधली, सत्कारानंतर जवानही भावूक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
नाशिक
राजकारण
बीड
Advertisement