Mumbai Rains News: मुंबई ठाण्याला पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर, मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त भागाचा आढावा
Mumbai Rains : मुंबई ठाण्याला पुढील 48 तासांसाठी हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर संभाव्या पावसाचा इशारा लक्षात घेता मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Mumbai Rains News: राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली असताना गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पावसाची संततधार सुरु आहे. अशातच आज आज (18 ऑगस्ट) आढवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने सर्वत्र एकाच दाणादाण उडवली आहे. सध्या देखील पावसाचा जोर कायम असून मुंबई, ठाणेकरांसाठी पुढील 48 तास पावसाच्या अनुषंगाने अतिशय महत्वाचे ठरणार आहे. कारण मुंबई ठाण्याला पुढील 48 तासांसाठी हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर संभाव्या पावसाचा इशारा लक्षात घेता मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त भागाचा आढावा
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. राज्यातील पूरग्रस्त भागाचा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेत असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संवाद सुरु असून मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला जात आहे. मुंबईसह पश्चिम उपनगरात आज (18 ऑगस्ट) पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.
हार्बर मार्गावरील लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने
मुंबईस उपनगरात कोसळणाऱ्या पावसाचा फटका हा रेल्वे वाहतुकीवर देखील पडला आहे. मानखुर्द, गोवंडी, कुर्ला आणि टिळक नगर येथे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल उशिराने धावत आहे. पावसाचा जोर वाढल्यास लोकल सेवेवर अधिक फरक पडू शकतो. सध्या हार्बर मार्गावरील लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहे. तर रुळांवर पाणी साचल्याने अतिशय धीम्या गतीने लोकल वाहतूक सुरू आहे. मुंबईसह पश्चिम उपनगरात आज (18 ऑगस्ट) पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.
सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे महानगरपालिका आयुक्तांनी निर्देश
मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज दुपारच्या सत्रात सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे महानगरपालिका आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. तर आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाने बृहन्मुंबई क्षेत्रात आज, सोमवारी (18 ऑगस्ट) अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी व अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
आणखी वाचा



















