Nagpur : 'त्या' कुटुंबीयांचे सलील देशमुखांकडुन सांत्वन, वीज पडून मृत्यू झालेल्यांच्या घरी जिल्हाधिकाऱ्यासह भेट
घरातील करते पुरुष गेल्याने या कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे. पिडीत कुटुंबीयांना लवकरच शासनाच्या माध्यमातुन मदत कशी मिळेल, यासाठी मी प्रर्यत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सांगीतले.
![Nagpur : 'त्या' कुटुंबीयांचे सलील देशमुखांकडुन सांत्वन, वीज पडून मृत्यू झालेल्यांच्या घरी जिल्हाधिकाऱ्यासह भेट Meeting with the Collector at the home of those who died due to lightning Nagpur : 'त्या' कुटुंबीयांचे सलील देशमुखांकडुन सांत्वन, वीज पडून मृत्यू झालेल्यांच्या घरी जिल्हाधिकाऱ्यासह भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/19/3b2209e02c52c4f2c0036008b5a472ac_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूरः शनिवारी वीज पडुन नरखेड तालुक्यातील हिवरमठ येथे योगेश पाठे तर पेठ मुक्तापुर येथील दिनेश कामडी व बाबाराव इंगळे यांच्या मृत्यू झाला होता. दरम्यान रविवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेता जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी या दोन्ही गावामध्ये जावून पाठे, कामडी व इंगळे कुटुंबीयांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. तसेच शासनाच्या माध्यमातुन लवकरच या तिनही कुटुंबीयांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सलील देशमुख यांनी यावेळी सांगीतले.
सलील देशमुख यांच्यासोबत यावेळी जिल्हाधीकारी आर. विमला, उपविभागीय अधिकारी श्रीकांत उभंरकर, तहसीलदार बि.डी. जाधव, जलालखेडयाचे ठाणेदार मनोज चौधरी, खंड विकास अधिकारी निलेश वानखेडे, सभापती निलीमा रेवतकर, जि. प. सदस्य प्रितम कौरे, पंचायत समीती सदस्य सुभाष पाटील, मयुर उमरकर, वसंत चांडक, अतुल पेठे, संजय बडोदेकर, नारायण ठाकरे, नानाजी माळोदे यांच्यासह सरपंच व इतर पदाधीकारी उपस्थीत होते. सुरुवातीला देशमुख यांनी पेठमुक्तापुर येथील इंगळे व नंतर कामडी कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर त्यांनी घटनेची संपुर्ण माहिती गावकऱ्यांकडून समजवून घेतली. घडलेली घटना अत्यंत दुदैवी असून परत अशा घटना होवू नये यासाठी काही मार्ग काढता येईल का, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत सुध्दा सलील देशमुख यांनी व्यक्त केले.
दहा दिवसांपूर्वीच झाला होता विवाह
यानंतर हिवरमठ येथील पाठे कुटुंबीयांची सुध्दा सलील देशमुख व जिल्हाधिकारी आर. विमला यांनी भेट घेवून सांत्वन केले. हिवरमठ येथे योगेश पाठे याचा 10 दिवसापुर्वी तर दिनेश कामडी यांचा पाच महिन्यापुर्वीच विवाह झाला होता. या घटनेमुळे पाठे, कामडी व इंगळे कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. शेवटी अनिल देशमुख साहेबांच्या मतदार संघातील प्रत्येक व्यक्ती आमच्या कुटुंबाचाच एक भाग आहे. या तिन्ही कुटुंबीयांना लवकरच शासनाच्या माध्यमातुन मदत करण्यात येईल असेही सलील देशमुख यांनी यावेळी सांगीतले.
आर. विमला यांनीही केले सांत्वन
यावेळी उपस्थीत असलेल्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी पिडीत कुटुंबीयांचे सांत्वन केले. घरातील महीला मंडळींना धिर देण्याचे त्यांनी काम केले. घडलेली घटना वाईट आहे, घरातील करते पुरुष गेल्याने या कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे. पिडीत कुटुंबीयांना लवकरच शासनाच्या माध्यमातुन मदत कशी मिळेल यासाठी सुध्दा मी प्रर्यत्न करणार असल्याचे यावेळी आर. विमला यांनी सांगीतले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)