एक्स्प्लोर
प्रयोगशील शिक्षिकांची कमाल, कमी बजेटमध्ये शाळेचं रुप पालटलं
लातूर: लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये यंदा विद्यार्थ्यांच्या संख्येत साडे पाच हजारांनी घट झाली आहे. पण दुसरीकडे याच जिल्ह्यातील झरी गावातील शाळा प्रयोगशील शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी बोलकी बनवली आहे.
सध्या लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १२३५ शाळा आहेत. त्यामध्ये पाहिली ते सातवी 98 हजार 600 विद्यार्थी शिकत आहेत. ग्रामीण भागात इंग्रजी शाळेचे पेव फुटल्यामुळे एका वर्षात साडे पाच हजार विद्यार्थ्याची संख्या घटली आहे.
पण दुसरीकडे याच जिल्ह्यातील झरी या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिले ते चौथीपर्यंतचे वर्ग खोल्या अक्षरशः बोलक्या झाल्या आहेत. कारण वर्गा बाहेरील भिंतींवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार या बाबत माहिती आकर्षकपणे चितारली आहे. वर्गात प्रवेश केला की, हिच जिल्हा परिषदेची शाळा आहे का? यावर विश्वास बसू नये एवढे शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे.
विशेष म्हणजे, या शाळेतीलही विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील शाळेच्या विद्यार्थ्याप्रमाणे पहिलीच्या वर्गातील सर्व विद्यार्थी इंग्रजीत सर्व प्राणी अंक वस्तूंचे नावे सांगतात. तसेच आठवड्याची नावे, फळांची नावे, दगड माती झुंबर झाडे आदींची माहिती देतात.
ज्ञानरचनावादी शैक्षणिक पद्धतीने शिक्षण देण्यासाठी पहिले ते चौथी वर्गाच्या शिक्षिकांनी प्रत्येकी सात हजार रुपये वैयक्तीक खर्च केला आहे. यातून त्यांनी अनेक टाकाऊ वस्तूंपासून शैक्षणिक साहित्य निर्मिती केली आहे. शाळेतील शिक्षकांची ही भावना पाहून सलग दोन वर्ष शाळेतील दोन शिक्षिकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.
सध्या या शाळेची प्रगती पाहुनच आठवीपर्यंतच मर्यादित असलेली शाळा दहावीपर्यंत करावी अशी मागणी गावकऱ्यांनी आहे. मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष आहे. अश्या गावकऱ्यांना आणि शाळा प्रशासनाने बळ देणे आवश्यक आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement