Vedanta Foxconn : युवासेनेचं राज्यभरात आंदोलन, वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा निषेध
Maharashtra : आज राज्यभरात युवासेनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे. वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या विरोधात सरकारचा निषेध म्हणून युवासेनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे.
Maharashtra : आज राज्यभरात युवासेनेकडून (Yuvasena) आंदोलन करण्यात येणार आहे. वेदांता (Vedanta) आणि फॉक्सकॉन (Foxconn) प्रकल्प गुजरातमध्ये (Gujrat) गेल्याच्या विरोधात सरकारचा निषेध म्हणून युवासेनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे. वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प गुजरातमध्ये गेला, यामुळे एक लाख तरुणांचा रोजगार गेला, याच्या निषेधार्थ युवासेनेतर्फे उद्या 15 सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत, तालुक्यात, शहरात, मुख्य चौकात निषेध मोहीम घेण्यात येणार आहे. 'शिंदे-फडणवीस या खोके सरकारच्या हलगर्जीपणामुळे वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेला आहे. त्यामुळे आता राज्यातील एक लाख तरुणांचा रोजगार हिरावला जाणार असल्याने आम्ही उद्या, 15 सप्टेंबरला राज्यभरात शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करणार असल्याचे युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी सांगितले.'
'वेदांता आणि फॉक्सकॉनवरुन राजकारण करणाऱ्यांचे मुखवटे फाटतील'
फॉक्सकॉनबाबत सरकारने अद्याप खुलासा केलेला नसून फॉक्सकॉनबाबत व्हॉट्सअॅपवर खोटे मेसेज फिरवण्याची कामं हे सरकार करतंय. तर शिंदेंनी 40 आमदारांसह मोठे प्रकल्पही पळवले, असा आरोप शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे.
वेंदाता, फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने युवासेना आक्रमक
वेंदाता आणि फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर आता युवासेना आक्रमक झालीय. शिंदे सरकारविरोधात उद्या युवासेना राज्यभर आंदोलन करणारेय. तर खोके सरकारच्या हलगर्जीपणामुळेच प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याची टीका युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी केली आहे.
पाहा व्हिडीओ : वेंदाता आणि फॉक्सकॉन विकासप्रकल्प गुजरातला, युवा सेनेकडून राज्यभरात आंदोलनाची घोषणा
प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय आधीच घेतलेला : अनिल अग्रवाल
वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर (Vedanta Foxconn Semiconductor) प्रकल्पाच्या मुद्यावरून महाराष्ट्रात राजकारण तापलेलं असताना यावर आता वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय आधीच घेतला असल्याचं अग्रवाल म्हणाले आहेत. जुलैत महाराष्ट्र सरकारनं कसोशीने प्रयत्न केलेला, असंही ते म्हणाले आहेत. त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या