एक्स्प्लोर
गुटख्याची पिचकारी हायव्होल्टेज विजेच्या तारेवर, तरुणाचा मृत्यू

मालेगाव : गुटख्याची पिचकारी थेट हायव्होल्टेज विजेच्या तारेवर मारणं तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. विजेच्या तीव्र धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मालेगावमध्ये घडली आहे. मोहम्मद यासिन मोहम्मद सलीम असं या 21 वर्षीय तरुणाचं नाव आहे. मोहम्मद यासिन हा तरुण अब्दुल खालिक पार्कजवळ त्याचा भाऊ मोहम्मद अमिनला भेटायला गेला होता. मोहम्मद अमिन हा येथे गफर अब्दुल हनिफ हुसैन यांच्या कापड कारखान्यात कपड्यांवर रंगकाम करतो. दुमजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर काम सुरु असताना मोहम्मद यासिनने तोंडातील गुटख्याची पिचकारी बाहेर मारली. मात्र या इमारतीच्या जवळून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीवर ही पिचकारी पडल्याने मोहम्मद यासिन विद्युत दाबाच्या दिशेने खेचला गेला. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी रमजानपुरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
मुंबई
लाईफस्टाईल
कोल्हापूर























