एक्स्प्लोर
Advertisement
तरुणीची छेड काढणाऱ्या तरुणाला माजी नगरसेवकाच्या मुलीने चोपलं
पिंपरी-चिंचवड : तरुणीची छेड काढणाऱ्या एका तरुणाला भाजपचे माजी नगरसेवक आणि त्यांच्या मुलीन चोप दिला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सोमवारी ही घटना घडली. मात्र फेसबुकवर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
एकाच कंपनीत कामाला असलेल्या एका तरुणीचं सहकाऱ्यावर प्रेम होतं. मात्र काही कारणामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. परंतु तरुणाने तिचा पिच्छा काही सोडला नाही. सार्वजनिक ठिकाणी त्याने संबंधित तरुणीची छेड काढली.
त्यानंतर तरुणीने त्याची तक्रार भाजपचे माजी नगरसेवक राजू दुर्गे यांच्याकडे केली. मग दुर्गे आणि त्यांच्या मुलीने तरुणाला चांगलाच चोप दिला. तिथेच उपस्थित असलेल्यांपैकी एकाने हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर हा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement