एक्स्प्लोर

ऑनलाईन परीक्षेसाठी काहीकाळ मंगलाष्टके थांबली, पेपर सोडवूनच नवरी बोहल्यावर चढली

यवतमाळमधील एका लग्नाची सध्या चर्चा आहे. लग्नाचा मुहूर्त अवघ्या काही वेळात असताना नवरीला पेपर असल्याचं समजलं. तसा निरोप तिने नवरदेवाला पाठवला. यानंतर दोन्ही बाजूच्या वऱ्हाड्यांसह पाहुणे मंडळींनी आधी परीक्षा मग लग्न असं ठरवलं आणि मंगलाष्टकं काहीकाळ थांबली. पेपर सोडवूनच नवरी बोहरल्यावर चढली

यवतमाळ : कोरोनाव्हायरसमुळे सगळ्याच गोष्टींवर बंधनं आली आहेत. मग शिक्षण असो वा लग्नसमारंभासारखे कार्यक्रम. सध्या लग्नसराईचा मोसम आहे. परंतु परीक्षा सुरु आहेत. शुभकार्यांसाठी मुहूर्त अतिशय महत्त्वाचे समजले जातात. परंतु यवतमाळमध्ये ऑनलाईनसाठी परीक्षेसाठी लग्नाचा मुहूर्त काहीकाळ पुढे ढकलण्यात आला. ऑनलाईन पेपर सोडवून मगच नवरी बोहल्यावर चढली.

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील सारीका अरुण शिखरे हिचा शुभविवाह अमरावती येथील निलेश साबळे यांच्यासोबत ठरला होता. दोन्ही बाजूंच्या वऱ्हाड्यासंह पाहुणे मंडळी मंगलाष्टकासाठी सज्ज होती. अशातच उपवर नवरी काही वेळातच आपली ऑनलाईन परीक्षा असल्याचं समजलं. यानंतर नवरीने नवरदेवाला निरोप पाठवला की बीएससी अॅग्रो सहकार विषयाचा 2 ते 2.40 पर्यंत ऑनलाईन पेपर आहे. ते सोडवून आपण लग्न करु. नवरदेवाने त्यांच्याकडील मंडळींना ही माहिती दिली आणि संपूर्ण विवाह मंडपात ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. दोन्हीकडील मंडळीसह उपस्थित पाहुणे मंडळीने आधी परीक्षा आणि नंतर लग्न करण्यास संमती दिली. नवरीने आनंदाने आपल्या वर्गमैत्रिणीसोबत ऑनलाईन पेपर सोडवला आणि नंतरच ती बोहल्यावर चढली. मंगलाष्टके होऊन विवाह पार पडला. 25 डिसेंबर रोजी हे लग्न पार पडलं.

ऑनलाईन पेपरकरता मंगलाष्टके थांबवून दोन्हीकडच्या वऱ्हाडासह पाहुणे मंडळीने शिक्षणाला प्राध्यान्य दिल्याबद्दल शिखरे आणि साबळे परिवाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पक्ष तुमचा पण माणूस आमचा! विवेक कोल्हेंच्या सत्काराला विखे विरोधक एकवटले, जनतेच्या कामासाठी विखे पाटलांकडे जाणार
पक्ष तुमचा पण माणूस आमचा! विवेक कोल्हेंच्या सत्काराला विखे विरोधक एकवटले, जनतेच्या कामासाठी विखे पाटलांकडे जाणार
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
A2MM Indradhanu Festival : अमेरिकेत घुमला मराठी संस्कृतीचा गजर! 'ॲन आर्बर मराठी मंडळा'चा विसावा वाढदिवस; दोन दिवसीय 'इंद्रधनू' महोत्सव संपन्न
अमेरिकेत घुमला मराठी संस्कृतीचा गजर! 'ॲन आर्बर मराठी मंडळा'चा विसावा वाढदिवस; दोन दिवसीय 'इंद्रधनू' महोत्सव संपन्न
NEET Exam : मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर

व्हिडीओ

Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड
Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Iran War Live Update: अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
Riteish Deshmukh on Raja Shivaji: रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
Bashir Badr: उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
Chhatrapati Sambhajinagar : अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
Embed widget