एक्स्प्लोर

Yavatmal : वन्यप्राण्याकडून शेतीपिकांचं मोठं नुकसान; दीड वर्षांपासूनचे 17 कोटी रुपये शासनाकडे थकीत

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणारी नुकसान भरपाई अद्याप मिळाली नसून ती गेली दीड वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील चिंतेत वाढ झाली आहे. 

यवतमाळ : जिल्ह्यात दरवर्षी वन्यजीवांकडून शेतीपिकांचं मोठं नुकसान होतं. कधी वन्यप्राण्यांकडून झालेल्या हल्ल्यात मनुष्यहानी होते तर कधी शेतकऱ्यांच्या पशुधनावर वन्यप्राणी हल्ले करतात. त्यामुळे पशुधनाचं सुध्दा मोठं नुकसान होतं. झालेलं नुकसान भरून काढणं कठीण असतं. वन विभाकडून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी काही प्रमाणात आर्थिक मदत दिली जाते. मात्र शासनाकडून गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित असलेली 17 कोटी रुपयांची ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही. 

वन विभागाकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीची रक्कम साधारण एका संबंधित व्यक्ती किंवा शेतकरी पशुपालक किंवा त्याच्या नातलगांना देणं अपेक्षित आहे. मात्र आज हजारो हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झालं असतानाही त्याच्या नुकसान भरपाईची रक्कम मागील दीड वर्षीत शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत .

सन 2020 मध्ये ही रक्कम साधारण 12 कोटी 65 लाख तर जानेवारी ते जून 2021 पर्यंत साधारणपणे 5 कोटी रुपये विविध प्रकरणात येणे अपेक्षित आहेत. साधारण दीड वर्षात 17 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे केली आहे, मात्र ती रक्कम आजही प्रलंबित आहे.

शासनाकडून ती प्रलंबित रक्कम प्राप्त झाल्यानंतर हे तात्काळ शेतकऱ्यांना आणि संबंधित व्यक्ती यांना ती रक्कम देण्यात येईल असे यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर यांनी सांगतले आहे .

यवतमाळ आणि वाशिम वनवृत्तमध्ये वन्यप्राण्यांच्याकडून जे नुकसान झाले त्याची आकडेवारी खालीलप्रमाणे,

सन 2020 मध्ये  मनुष्यहानी 2 प्रकरण असून त्याचे 30 लक्ष प्रलंबित आहेत तर वन्यप्राणी यांच्या कडून झालेल्या हल्ल्यात मनुष्यजखमी झाल्याचे  75 प्रकरण आहे, ज्यात 49 लाख 80 हजार रुपये प्रलंबित रक्कम आहेत .तर पीक पीकहानी मध्ये 32918 प्रकरणात 11 कोटी 66 लाख रुपये प्रलंबित आहेत. तसेच पशुधनहानी 466 प्रकरणात 78 लक्ष 83 हजार रुपये प्रलंबित आहेत अशा प्रकारे 12 कोटी 65 लक्ष रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे.
 
जानेवारी 2021 ते जून 2021 पर्यंत मनुष्य जखमीचे 33 प्रकरणं मध्ये 13 लाख 18 हजार तर पीक हानी चे 14 हजार 857 प्रकरणं मध्ये 4 कोटी 24 लाख 71 हजार रुपये प्रलंबित आहेत तर पशुधन हानीचे 112 प्रकरण 16 लाख 39 हजार रुपये प्रलंबित आहेत. असे या वर्षाचे मिळून साधारण 5 कोटी रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम संबंधित व्यक्ती, शेतकऱ्यांना एका महिन्याच्या आत मिळणे अपेक्षित आहे. मात्र दीड वर्ष झाले तरी ती रक्कम संबंधित व्यक्तीना मिळाली नाही त्यांना आजही त्याची वाट पाहावी लागतेय

यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील शेतकरी मनीष जाधव यांच्या शेतात सन 2020 च्या रब्बी हंगामात त्यांनी गहू पिकांची लागवड केली. मात्र रोही आणि रानडुक्करच्या कळपाने त्याच्या गहू पिकांचे मोठं नुकसान केले. नुकसान भरपाई मिळावी म्हणून त्यांनी वन विभाग पुसद येथे अर्ज केला, चकरा मारून ते थकले मात्र त्यांना वर्ष झाला तरी झालेल्या नुकसानची भरपाई ची रक्कम अजून मिळाली नाही.

महागाव तालुक्यातील पिंपळगाव येथिल शेतकरी जयसिंग राठोड यांच्या शेतात मागील वर्षी वन्य प्राण्याकडून तूर ,कापूस या पिकाच नुकसान झाले त्यानंतर त्यांनी जून 2020 मध्ये वन विभागाकडे नुकसान भरपाई बाबत अर्ज केला होता मात्र त्याची रक्कम अजून त्यांना मिळाली नाही. 

दीड वर्षात साधारण 17 कोटी रुपयांचा नुकसान भरपाईची रक्कम वन विभागाकडे प्रलंबित आहे. ती रक्कम शेतकऱ्यांना कधी मिळते याचीच आता सर्वाना प्रतीक्षा आहे.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 20 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागणार?
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार?
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
Embed widget