रात्रीच्या वेळी घडणाऱ्या अप्रिय घटना टाळण्यासाठी शिवाजी पार्क येथे पोलीस यंत्रणेनं उचलली महत्त्वाची पावलं
फेब्रुवारी 2021 मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यानंतर अद्यापपर्यंत अशी एकही तक्रार आली नाही.
मुंबई : शिवाजी पार्क बीचवर दादर पोलिसांनी 25 फ्लड लाइट्स आणि 20 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, यामुळे संपूर्ण समुद्रकिनाऱ्यावर रात्री उजेड असून सीसीटीव्ही कॅमेर्याद्वारे संपूर्ण समुद्रकिनार्यावर नजर ठेवण्यात येत आहे. शिवाजी पार्क बीच येथे मोबाइल चोरी, बॅग पुलिंग, ईव्ह टीझिंग आणि एनडीपीएस संबंधित तक्रारी येत असत, परंतु फेब्रुवारी 2021 मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यानंतर अद्यापपर्यंत अशी एकही तक्रार आली नाही.
दादर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजी पार्क बीचवर मोबाईल चोरी, बॅग चोरी, इव्ह टीझिंगसारख्या तक्रारी अंधारानंतर येत असत. समुद्रकिनार्यावर वेळ घालवण्यासाठी आलेल्या जोडप्याजवळ मोबाईल चोरणे, त्यांच्या हातातली बॅग खेचून पळवून नेणे आणि मुलींवर भाष्य करणे यासारखी कृत्य होत होती. तिथे समुद्रकिनार्यावर मद्यपान केल्याच्या तक्रारी येत होत्या. हे सर्व रात्रीच्या वेळी घडत असल्याने अंधाराचा फायदा घेत ही लोकं पळून जात होती. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही आणि दिवे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्याचा फायदाही होताना दिसत आहे.
पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, शिवाजी पार्क बीचवर वर्ष 2018 मध्ये 9, 2019 मध्ये 7, 2020 मध्ये 7 तक्रारी नोंदवण्यात आल्या, त्यानंतर फेब्रुवारी 2021 महिन्यात एकूण 25 दिवे आणि 20 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. ज्यामुळे संपूर्ण समुद्रकिनार्यावर रात्रीच्या वेळेस लक्ष ठेवणे सोपे झाले , त्यानंतर येथे कोणताही गुन्हा दाखल झाला नाही, रात्री उजेड आहे आणि येणारे लोक सीसीटीव्ही कॅमेच्या देखरेखीखाली आहेत.
शिवाजी पार्क बीचवर एनडीपीएस, ईव्ह टीझिंग, एक पॉस्को आणि एक बलात्कार प्रकरणांचा समावेश आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की जेव्हा समुद्रकाठी येणारी जोडपी एका जागी बसून बोलत असतात तेव्हा त्यांचे मोबाइल फोन किंवा बॅग चोरी केल्या जातात. चोरीनंतर ही जोडपी तक्रार घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येतात, परंतु जेव्हा पोलीस त्यांना एफआयआर नोंदवायला सांगतात तेव्हा ही लोक तक्रार देण्यास नकार देतात. ही जोडपे सांगतात की एफआयआर दाखल झाला तर कुटुंबातील लोकांना समजेल की हे लोक समुद्रकिनार्यावर फिरायला आले होते.
Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एका क्लिकवर
तसेच "येथे येणारी काही जोडपी अशी आहेत की ती अंधार पडताच चुकीची कामे करण्यास सुरवात करतात, ज्याची तक्रार स्थानिक लोकांनी केली आहे. दिवे बसविल्यानंतर अशा तक्रारी ही येणं बंद झालं आहे", असंही सांगण्यात आलं आहे.
"फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण समुद्रकिनारा उजेड पडावा यासाठी 25 दिवे आणि 20 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तेव्हापासून शिवाजी पार्क बीचवर कोणतीही तक्रार मिळाली नाही.या वर्षाची सुरुवातीपासून ते आता पर्यंत रात्रीच्या वेळेस कुठली ही अप्रिय घटना घडली नाही. त्यामुळे शिवाजी पार्क हा परिसर आता रात्रीच्या वेळेस आणखीनच सुरक्षित झाला आहे.