Corona Vaccine : Zydus Cadila आपल्या ZyCoV-D लसीच्या आपत्कालीन वापरासाठी करणार अर्ज
Zydus Cadila च्या लसीला मंजुरी मिळाल्यास ती भारतातील चौथी तर स्वदेशी प्रकारातील दुसरी लस असणार आहे. तसेच ही कोरोनाविरोधातील जगातील पहिलीच DNA आधारित लस असणार आहे.
नवी दिल्ली : भारतातील अग्रगण्य औषध कंपनी असलेल्या Zydus Cadila कंपनीकडून त्याच्या ZyCoV-D या लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळावी अशी विनंती करण्यात येणार आहे. येत्या आठवड्याभरात ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DCGI) तशा प्रकारची विनंती करण्यात येणार असून या लसीला मान्यता मिळाल्यास ती जगातील पहिली DNA आधारित लस असणार आहे.
भारतात आतापर्यंत तीन लसींच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळाली आहे. Zydus Cadila च्या ZyCoV-D लसीच्या वापराला परवानगी मिळाल्यास ती देशातील चौथी तर स्वदेशी प्रकारातील दुसरी लस असणार आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची आकडेवारी तयार आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी Zydus Cadila ने 28,000 स्वयंसेवकांचा वापर केला होता. त्याचा अहवाल आता ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DCGI) जमा करण्यात येणार आहे. ही लस 12 ते 18 वयोगटातील बालकांसाठीही उपयुक्त असेल असं सांगण्यात येतंय.
Zydus Cadila likely to seek emergency authorisation for ZyCoV-D COVID-19 vaccine in 7-8 days
— ANI Digital (@ani_digital) June 18, 2021
Read @ANI Story | https://t.co/3CCwQOwTWU pic.twitter.com/M04S9q1sCF
Zydus Cadila ची ZyCoV-D ही लस डीएनए आधारित असल्याने त्यामध्ये एक जेनेटिक कोड आहे. त्या जेनेटिक कोडमुळे शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
अहमदाबाद स्थित या कंपनीच्या लसीच्या साठवणुकीसाठी दोन ते चार डिग्री सेल्सियस तापमानाची गरज असते. त्यामुळे त्याच्या साठवणुकीसाठी कोल्ड चेनची आवश्यकता नाही. त्यामुळे देशभरात त्याचे वितरण सुलभपणे होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत देशात भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन, सीरमची कोविशिल्ड आणि रशियन स्पुटनिक व्ही या लसींना परवानगी मिळाली आहे. यात आता ZyCoV-D ची भर पडण्याची शक्यता आहे.
मोनोक्लोनल अॅन्टिबॉडी चाचणीसाठीही परवानगी मागितली
कोरोना विरोधातल्या लढाईमध्ये एक महत्वाचं हत्यार म्हणून पुढं येत असलेल्या मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीच्या चाचणीला ( ZRC-3308) परवानगी मिळावी अशी विनंती झायडसने ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DCGI) या आधीच केली आहे. मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीचा वापर अमेरिकेत आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीच्या डोसनंतर कोरोना रुग्णाला रुग्णालयात भरती होण्याची गरज नसते. तसेच या डोसमुळे कोरोना होण्याचीही शक्यता अत्यंत कमी आहे.
महत्वाच्या बातम्या :