एक्स्प्लोर

जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा : बुलडाण्याच्या मोनाली जाधवला दोन सुवर्णांसह तीन पदकं

चीनमध्ये झालेल्या जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय पोलीस दलाचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील जलंब पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत महिला कॉन्स्टेबल मोनाली हर्षचंद्र जाधव हिने तिरंदाजीमध्ये विक्रमी कामगिरी केली आहे.

बुलडाणा : चीनमध्ये नुकतीच जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारतातील अनेक पोलीस सहभागी झाले होते. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील जलंब पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेली महिला पोलीस कॉन्स्टेबल मोनाली जाधवदेखील सहभागी झाली होती. मोनालीने तिरंदाजीमध्ये विक्रमी कामगिरी केली आहे. 'टार्गेट आर्चरी'मध्ये मोनालीने 720 पैकी 716 गुण मिळवत दोन सुवर्ण पदकं आणि एक कांस्यपदक जिंकले आहे. मोनाली जाधव ही 2013 मध्ये पोलीस दलात भरती झाली असून बुलडाण्यामधील आनंद नगर येथील राहवासी आहे. सध्या ती जलंब पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. चीनच्या चेंगडू येथे 8 ते 18 ऑगस्टदरम्यान जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा झाल्या. यामध्ये मोनालीने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधले आहे. मोनालीने फिर्ल्ड आर्चरीमध्ये सुवर्ण, तर 'थ्रीडी' आर्चरी प्रकारात कांस्य पदक पटकावले आहे. मोनालीने मे महिन्यात शांघाय येथे झालेल्या विश्व स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करत जागतिक स्तरावर नववे स्थान मिळवले होते. मोनाली जाधवला तिरंदाजी प्रशिक्षक चंद्रकांत इलग, सुरेश शिंदे यांचे मार्गदर्शन तसेच पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन मिळाले. बुलडाणासारख्या साधारण शहरात आणि गरीब कुटुंबात राहणारी मोनाली बारावी असताना तिच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. घरातील कमावता पुरुष गेल्याने सर्व जबादारी तिच्या आईवर आली. आईला मदत व्हावी आणि मोनालीचे शिक्षण पूर्ण व्हावे, यासाठी मोनालीच्या मोठ्या भावाने त्याचे शिक्षण बंद करुन मजुरी करायला सुरुवात केली. आई आणि भाऊ मजुरी करुन घरचा प्रपंच चालवत होते, हे पाहत असताना कुटुंबासाठी आपणही मदत करावी अशी भावना मोनालीच्या मनात येत होती. त्याचवेळी महाराष्ट्र पोलीस दलात भरती सुरु झाली. खेळाची लहानपणापासूनच आवड असल्याने मोनालीने पोलीस भरती प्रक्रिया यशस्वीरित्या पास करुन ती बुलडाणा पोलीस शिपाई म्हणून भरती झाली. सैन्यदलातून निवृत्त होऊन मोनालीच्या बॅचमध्ये महाराष्ट्र पोलीसमध्ये भरती झालेले चंद्रकांत टिळक यांनी मोनालीची खिलाडूवृत्ती पाहून तिला तिरंदाजीबद्दल मार्गदर्शन केले. ते ऐकून मोनालीलाही तिरंदाजीबद्दल आवड निर्माण झाली. प्रशिक्षक चंद्रकांत टिळक यांच्या मार्गदर्शनात तिने खेळायला सुरुवात केली. त्यानंतर ती या खेळात निपुण झाली. आतापर्यंत तिरंदाजीच्या अनेक स्पर्धा मोनालीने गाजवल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget